• -10%

One For The Road (वन फॉर द रोड)

SKU
9788177666489
In stock
Special Price ₹108.00 "was" ₹120.00
Author : V P Kale Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : कथा संकिर्ण
ISBN No. : 9788177666489

-
+
payment-image

उभ्या-आडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही मराठीचे प्रेम जेथे जोपासले जाते तेथेही, वसंत पुरुषोत्तम काळे हे नाव लोकप्रिय आहे. त्या नावाशी एक प्रतिमा निगडित आहे. देखणी, प्रसन्न, उत्साहवर्धक, ती कथा-कथनकाराची. पण ती प्रतिमा म्हणजे त्यांच्या कथेचेच प्रतिबिंब आहे, इतकी ती कथा आणि तिचे लेखक आणि ती कथन करणारे कलावंत एकरुप झालेले आहेत. कथा पुण्या-मुंबईच्या मध्यमवर्गी( आणि मध्यममार्गी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वर्ज्य नाही, पण तिचे फार कौतुकही नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषोत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. - मं. वि. राजाध्यक्ष

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther V P Kale
Translator -
Edition 2013/03 - 1st/1975
Weight 0.140000
Pages 134
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788177666489
Write Your Own Review
You're reviewing:One For The Road (वन फॉर द रोड)
Your Rating
More from This author