• -10%

Swapnatil Chandane (स्वप्नातील चांदणे)

SKU
9788177668025
In stock
Special Price ₹90.00 "was" ₹100.00
Author : Ratnakar Matkari Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : कथा संकिर्ण
ISBN No. : 9788177668025

-
+
payment-image

जेमतेम विशीचे असताना रत्नाकर मतकरींनी पहिली परिकथा लिहिली : ‘सोनेरी मनाची परी’. अर्थातच, ती प्रेमकथा होती. एका तरूणानं, सगळ्या तरुणांसाठी लिहिलेली. त्या पाठोपाठ आल्या, या संग्रहातल्या इतर परिकथा- खरं तर प्रेमकथा. त्यांची कथनशैली अगदीच वेगळी. भाषा लयबध्द, नादमधूर. इतकी चित्रदर्शी, की जसा एखादा गतीमान चित्रपटच आपल्या नजरेसमोर उलगडतोय. कुठं कुठं तर, छायाचित्रण केलेलं असावं तसं, छायाप्रकाश आणि आकृती यांचे खेळ दिसतात. ही किमया मतकरींच्या शब्दांची. परिकथा केवळ मुलांसाठी नसतात. जे मनानं तरुण आहेत, ज्यांना जीवनातलं काव्य जाणवतं, सौंदर्याचा शोध घ्यावासा वाटतो, सुखदु:खाच्या सर्व छटांमध्ये रंगावंसं वाटतं, त्या प्रौढांसाठी, या जणू कथारूपानं सांगितलेल्या कविता आहेत. प्रेमाविषयीच्या. प्रेमातला अत्युकट आनंद, विरहाच्या असह्य वेदना, यांच्याही पलीकडे जाऊन, प्रेमातला त्याग, प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत, प्रेमामुळे झालेले अंतर्बाह्य बदल, अशा सर्वच प्रेमरंगांची गाथा आहे ही. आज, काल किंवा उद्या, प्रेमात पडणार्‍या प्रत्येकानं वाचल्याच पाहिजे, अशी या शैलीतल्या, या एवढ्याच कथा मतकरींनी लिहिल्या, आणि साचा मोडून टाकला. त्यांच्या एकूण लिखाणात असा दुसरा संग्रह नाही. एकूण मराठी वाङ्‍मयातच एकमेवाव्दितीय असा हा कथासंग्रह.

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Ratnakar Matkari
Translator -
Edition 2013/01 - 4th/1973
Weight 0.084000
Pages 66
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788177668025
Write Your Own Review
You're reviewing:Swapnatil Chandane (स्वप्नातील चांदणे)
Your Rating
More from This author