Author : | Publisher : Mehta Publishing House |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9788177663341 |

Author : | Publisher : Mehta Publishing House |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9788177663341 |
‘पाहिलंस, मिलिंद, माणूस अंतर्मुख होण्याला केवढा भितो, ते? दुसर्याच्या दु:खाकडे तो निर्विकारपणे पाहू शकतो. त्याच्या दु:खाची छाननी करू शकतो; पण स्वत:चं परीक्षण करताना मात्र तो व्याकूळ होतो. दुसर्याच्या जखमेवरची पट्टी दूर करण्याच्या कल्पनेनंही तो कासावीस होतो... ‘याचं कारण? ‘कारण एकच... जीवनावरची अश्रध्दा. जीवन जगण्यात असलेला प्रामाणिकपणाचा अभाव. सारेच व्यवहार स्वार्थप्रेरित. मानव एकटाच जन्माला येतो आणि त्याला शेवटी एकटंच जावं लागतं, तरीही त्याला आयुष्यभर सोबतीची आवश्यकता असते. ही सोबत तो शोधीत असतो. आयुष्य क्षणभंगुर आहे, हे माहीत असूनही, चिरंतन, शाश्र्वत प्रेमाचं ठिकाण त्याला हवं असतं; पण हे सारं स्वत:ला सुरक्षित राखून... ‘दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वत: हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवणं जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं...’
Publisher | Mehta Publishing House |
---|---|
Translator | - |
Edition | 2012/01 - 1st/1994 |
Weight | 0.118000 |
Pages | 107 |
Language | Marathi |
Binding | Paper Bag |
ISBN No. | 9788177663341 |