आचार्य प्र. के.अत्रे यांचे व्यक्तिमत्व अनेकरंगी होते. कवी, विडंबनकार, नाटककार, पत्रकार, पटकथाकार, कादंबरीकार व कथाकार, विनोदी लेखक, आत्मचरित्रकार असे त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी आणि बहुचर्चित व्यक्रिमत्वाचे विविध पैलू. एवढेच नाही तर असामान्य वक्ते, राजकीय नेते, संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते, शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या विपुल साहित्य संपदेबद्दल ना. ग. गोरे म्हणतात- "अत्र्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची उतरंड रचली तर तिचा मनोरा आचार्यांच्या धिप्पाड देहयष्टीएवढा भरेल." ’हशा आणि टाळया,’ मिळ्वणा-या या सम्राटाला वगळून मराठी वाड्ङ्मयाचा इतिहास लिहिणे शक्यच नाही.