Karvirnivasini Shri Mahalakshmi (करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी)
Author : R C Dhere | Publisher : Padmagandha Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : 9788186177310 |

Author : R C Dhere | Publisher : Padmagandha Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : 9788186177310 |
करवीर अथवा कोल्हापूर हे क्षेत्र आणि श्रीमहालक्ष्मी ही त्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता यांना महाराष्ट्राच्या देव्हा-यात अग्रमानाचे स्थान आहे. अनेका मराठी घराण्यांची ही कुलदेवता आणि दक्षिणकाशीची प्रतिष्ठा पावलेले तिचे करवीर क्षेत्र यांचा स्वरूपशोध डॉ. ढेरे यांनी या ग्रंथात मर्मग्राही संशोधनदॄष्टीने घेतला आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या पीठाच्या प्रभावाला मागोवा घेताना सातवाहनकाळापर्यंत पोचण्याचा त्यांचा साधार प्रयत्न लक्षवेधी आहे. महालक्ष्मीच्या नित्य-नैमित्तिक अशा दीर्घ उपासनापरंपरेचा परिचय तर त्यांनी या ग्रंथात घडवला आहेच, पण तिच्या क्षेत्रमाहात्म्यांचा विविधांगी आणि व्यापक असा सांस्कॄतिक अन्वयार्थही प्रथमच स्पष्ट केला आहे. आदिम प्रवॄत्तीच्या देवतांनी या देवतेविषयी दाखवलेल्या आत्मीयतेचा जाणता उलगडा त्यांनी केला आहे आणि या देवतेने केलेल्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या नाना दैवतांच्या उपासनेच्या सात्त्विकीकरणाचा मार्मिक शोधही घेतला आहे. कर्नाटकातील कोल्लूरची मूकांबिका आणि बदामीची बनशंकरी या दोन देवतांशी असलेल्या महालक्ष्मीच्या अनुबंधांचा स्थलपुराणांच्या आधारे त्यांनी घेतलेला शोध हा या ग्रंथाचा मौलिक विशेष म्हणावा लागेल. महाराष्ट्र-कर्नाटकातील राजघराण्यांनी महालक्ष्मीच्या उपासनेतून मिळवलेल्या असाधारण प्रतिष्ठेकडे त्यांनी संशोधनपूर्वक लक्ष वेधले आहेच, पण एकूणच या ग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे भारताशी असलेले आंतरसंबंध दृढ करणा-या सांस्कॄतिक सामस्याकडे वाचकाला घेऊन जाण्याचे पूर्वस्वीकृत कार्यही त्यांनी या नव्या प्रतिभा संशोधनातून पुढे नेले आहे.
Publisher | Padmagandha Prakashan |
---|---|
Auther | R C Dhere |
Translator | - |
Edition | 2010/07 - 1st/2009 |
Weight | 0.654000 |
Pages | 431 |
Language | Marathi |
Binding | Hard Bound |
ISBN No. | 9788186177310 |