• -10%

Lokpal Raja Sayajirao (लोकपाल राजा सयाजीराव)

SKU
9788177868081
In stock
Special Price ₹202.50 "was" ₹225.00
Author : Baba Bhand Publisher : Saket Prakashan Pvt Ltd
Translator : - Category : ऐतिहासिक चरित्र
ISBN No. : 9788177868081

-
+
payment-image

कुठलीही शैक्षणिक पाश्र्वभूमी नसताना अचानक एक शेतक-याचा पोर राजा बनतो आणि आपल्या गरीब रयतेला पोशिंदा होतो, अशा अलौकिक राजाची ही चारित्रगाथा. जगभराच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक सुधारणा आपल्या राज्यात रुजविण्याचा अथक प्रयत्न करणारा राजा ही महाराजा सयाजीराव गायकवाड यांची ओळख आहे. ब्रिटिश सत्तेला न जुमानता त्यांच्याविरुद्ध लढणा-या भारतीय क्रांतिकारकांची सातत्याने पाठराखण केली. ब्रिटिशांनाही हेवा वाटेल अशी राजा व प्रजा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी आधुनिक प्रशासननीती रुजविली. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पॄश्यताबंदी, वेठबिगारी संपविणे यासाठी कायदे केले. ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य, जलसिंचन, आरोग्यसंरक्षण, महिला सक्षमीकरण, सार्वजनिक ग्रंथालये, कलाप्रदर्शन अशा विविध सुधारणांचे प्रकल्प राबविले. विवेकानंदांनंतर दुस-या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्षस्थान भूषवून जागतिक पातळीवर भारताच्या ठसा निर्माण केला. म. फुले, शाहू महाराज डॉ. आंबेडकर, भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, लोकमान्य टिळक, न्या. रानडे, ना. गोखले, योगी अरविंद या सर्व प्रज्ञावंतांना त्यांचे भक्कम वैचारिक व आर्थिक पाठबळ लाभले. अक्षरओळख नसताना राजपद प्राप्त झालेल्या या माणसाने ही किमया कशी घडवून आणली याचा शोध घेण्यासाठी त्यांची पत्रे, भाषणे, ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली कागदपत्रे आणि अनेकविध संदर्भ साहित्याचा मागोवा घेऊन बाबा भांड यांनी हे चरित्र लिहिले आहे. राजकारण, प्रशासन, व्यवस्थापन क्षेत्रातल्या व्यक्तींना तर हे चरित्र मार्गदर्शक आहेच; परंतु शून्यातून स्वत:चे उज्ज्वल भविष्य घडवू इच्छिणा-या नव्या पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल अशी ही संघर्षगाथा आहे.

More Information
Publisher Saket Prakashan Pvt Ltd
Auther Baba Bhand
Translator -
Edition 2013 - 1st/2013
Weight 0.226000
Pages 240
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788177868081
Write Your Own Review
You're reviewing:Lokpal Raja Sayajirao (लोकपाल राजा सयाजीराव)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat