सामान्य परिस्थितीतून आणि अडचणीतून मार्ग काढुन अमेरिकेत मोठा उद्योगपती झालेल्या एका मराठी माणसाची गोष्ट !
प्रतिक्रिया
धडपडणा-या मराठी मुलांपुढे डॉ. श्री ठाणेदार यांचे जीवन हे दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवणारे आहे. हे पुस्तक मराठी तरुणाला नवा प्रकाश दाखवील, नवा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण करील. या पुस्तकाचे प्रत्येक पान ही प्रकाशाची नवी वाट आहे- मंगेश पाडगांवकर, २८.०७.२००८;
''श्री,तुझे हे पुस्तक भारतात खुप यशस्वी ठरले याचा मला अतिशय आनंद झाला ! अमेरिकेतील युवा पिढीसाठी तु हे पुस्तक इंग्रजीत लिहावे असे तुला सुचवत आहे." - बिल क्लिन्टन
"अवघड परिस्थितीवर मात करुन अमेरिकेत विजयाचा झेंडा फडकविणारे श्रीनिवास ठाणॆदार यांचा आम्हां सर्वांना अभिमान आहे, हे पुस्तक सर्वांनी वाचावे"- मा. विलासराव देशमुख, दिवंगत माजी मुख्यमंत्री- महाराष्ट्र.
"ठाणेदारांची जिद्द, चिकाटी, मेहनत, वाखाणण्यासारखी आहे. हे पुस्तक जणू निराशावादाचे औषधच!" - अनिल अवचट, साहित्यिक.
"तुमचे हे पुस्तक ’ही ’श्री’ची इच्छा!’ एका फटक्यात वाचून काढले. एक चांगला अनुभव आला,!. यू आर सिम्पली ग्रेट! नो वर्डस..." - प्रशांत दामले, अभिनेता.