पूर्वपीठिका’ या प्रकरणात कोणत्या पाश्र्वभूमीवर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची, न्यू इंग्लिश स्कूलची आणि फग्र्युसनची स्थापना झाली त्याचा तपशील दिला आहे आणि ‘फग्र्युसनचा शुभारंभ’ या प्रकरणात फग्र्युसनचा शुभारंभ कधी आणि कुठे झाला, ‘फग्र्युसन’ हे नाव का दिलं गेलं, याचा उल्लेख आहे. तसेच फग्र्युसनचा शुभारंभ सोहळा, त्याला उपस्थित असलेले मान्यवर, त्यांनी केलेली भाषणे, डेक्कन कॉलेजच्या विलीनीकरणाचा सरकारकडून आलेला प्रस्ताव, फग्र्युसनचे नवीन जागेत झालेले स्थलांतर, फग्र्युसनची पहिली दहा वर्षे, फग्र्युसनच्या संदर्भातील आर्थिक बाबी, पदवी परीक्षेचा व्यापक केलेला अभ्यासक्रम, वसतिगृह योजना, फग्र्युसनचे पहिले विद्यार्थी संमेलन, टिळकांचा राजीनामा इ. महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश या प्रकरणात आहे. ‘प्लेगच्या आपत्तीचे दशक’ या प्रकरणात फग्र्युसन कॉलेजच्या नव्या मुख्य इमारतीचे झालेले उद्घाटन, आगरकरांचे निधन, सोसायटीच्या घटनेत झालेल्या महत्त्वाच्या दुरुस्त्या, प्लेगची भयानक वर्षे, र.पु. परांजपे रँग्लर झाल्याची घटना इ. बाबींची नोंद आहे.