• -10%

Marathyancha Itihas Granthasuchi ( मराठ्यांचा इतिहास ग्रंथसूची )

SKU
9788171857364
In stock
Special Price ₹630.00 "was" ₹700.00
Author : Kavita Bhalerao Publisher : Popular Prakashan Pvt Ltd
Translator : - Category : संदर्भग्रंथ
ISBN No. : 9788171857364

-
+
payment-image
Overview

या ग्रंथसूचीच्या दुसर्‍या आवृत्तीतही मराठी व इंग्रजी असे दोन विभाग पाडले आहेत व प्रत्येक विभागात ग्रंथकार नामसूची आणि ग्रंथाविषय वर्गीकरण सूची असे उपविभाग आहेत. त्यामूळे ग्रंथ किंवा ग्रंथकार यांपैकी कोणत्याही एका नावावरून संदर्भ शोधणे शक्य होते. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि संशोधकांना सुलभ रीतीने ग्रंथांचा शोध घेता यावा यासाठी या सूचीची केलेली ही रचना मार्गसर्शक ठरते.

ज्या विषयाचा पूर्ण शोध करण्याला शेकडो वर्षेही अपुरी पडावी, त्यांचा शोध शास्त्रोक्त पध्द्तीने तयार केलेल्या ग्रंथसूचीवरून क्षणार्धात लागू शकतो आणि अभ्यासकाच्या मार्गातील विघ्नांचे निराकरण होऊन त्याचा मार्ग सोपा होतो, असे सूचीचे महत्त्व थोर सूचीकार शं. ग. दाते यांनी वर्णन केले आहे, सुमारे अडीचशे वर्षांची व्याप्ती असलेल्या मराठा इतिहासाच्या अभ्यासकांना तर सूची हे वरदानच ठरावे, कारण या विषयात आजवर बरेच संशोधन झाले आहे. अनेक नवनवे संदर्भ उपलब्ध होत आहेत, अनेक इतिहास संशोधकांनी त्यावर भाष्ये केली आहेत, ग्रंथ लिहिले आहेत. पण हे संदर्भ, संदर्भग्रंथ अनेक ग्रंथालयांत विखुरलेले असल्याने सहजपणे उपलब्ध नाहीत. गो.स.सरदेसाईकृत मराठी रियासती चे पुनर्संपादन करताना संदर्भांच्या या अनुपलब्धतेची जाणीव झाली तेव्हा सूचीची आवश्यकता वाटली. आणि मराठ्यांचा इतिहास ग्रंथसूची या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

More Information
Publisher Popular Prakashan Pvt Ltd
Auther Kavita Bhalerao
Edition 2017
Weight 0.900000
Pages 530
Language Marathi
Binding Hard Bound
ISBN No. 9788171857364
Write Your Own Review
You're reviewing:Marathyancha Itihas Granthasuchi ( मराठ्यांचा इतिहास ग्रंथसूची )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat