Chatrapati Shivaji Maharajanche Vadilbandhu Sambhajiraje Bhosale ( छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलबंधु संभाजीराजे भोसले )
Author : V S Bendre | Publisher : Marathidesha Foundation |
Translator : - | Category : शिवाजी महाराज साहित्य |
ISBN No. : 9788194998488 |

परकीय राजसत्तेचे उच्चाटन व स्वकीयांच्या स्वराज्याचे संस्थापन हे या तिघाही बापलेकांचे ध्येय होते. शहाजी व शिवाजी यांना नेतृत्व पदाचा मान मिळाल्याने सामान्य लोकात त्यांची कीर्ती चिरकाल टिकली. परंतु त्याच ध्येयाने आपला कार्यभाग उत्तम प्रकारे साधणार्या संभाजीची कीर्ती केवळ नेतृत्वपदाचा मान अपमृत्यूने लाभला नाही म्हणून, लोकस्मृतीतून लोप पावली. इतिहासाला मात्र एवढ्या श्रेष्ठ दर्जाच्या राष्ट्रसेवकाला विसरता येणार नाही !!