{"title":"Bhagyashree Prakashan","description":"\u003cp\u003eBhagyashree Prakashan Books\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"srujan-sanwad-bhag-1-सृजन-संवाद-भाग-१","title":"Srujan Sanwad Bhag 1 ( सृजन संवाद  भाग १ )","description":"\u003cp\u003eसामाजिक सुरक्षा, जतन साक्षरता, योग, अध्यात्म, संगीत, गीत, आरोग्यसेवा या सर्व गोष्टी जीवनावश्यक ! माणसं एक - एक विषय आपलं जीवनध्येय म्हणून निवडतात नि त्यासाठी आयुष्य पणाला लावतात. हे सर्व चित्रित, शब्दबद्ध करणाऱ्या या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौन्दर्याचं प्रतिबिंब ! आरसाच जणू. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : गोपाळ अवटी , प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49851601355074,"sku":"9788194282853","price":382.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/srujansanvad1-F.jpg?v=1743479057"},{"product_id":"srujan-sanwad-bhag-2-सृजन-संवाद-भाग-2","title":"Srujan Sanwad Bhag 2 ( सृजन संवाद  भाग 2 )","description":"\u003cp\u003eकिती तऱ्हेची माणसं भेटतात या पुस्तकात ! मराठी समाजाचा विस्तृत पटल आहे. महाराष्ट्राचं प्रोफाईल आहे. मुलाखती त्या त्या व्यक्तींच्या शब्दात आणि शैलीत आहेत. कुठलीही व्यक्ती निवडून ते प्रकरण उघडावे आणि सौन्दर्य न्याहाळावे. - डॉ. अनिल अवचट \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : गोपाळ अवटी , प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49851636220226,"sku":"9788194282860","price":382.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/srujansanvad2-F.jpg?v=1743479056"},{"product_id":"gopal-avati-set-of-2-books-गोपाळ-अवटी-२-पुस्तकांचा-संच","title":"Gopal Avati set of 2 Books ( गोपाळ अवटी २ पुस्तकांचा संच )","description":"\u003cp\u003eGopal Avati set of 2 Books ( गोपाळ अवटी २ पुस्तकांचा संच )\u003c\/p\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eSrujan Sanwad Bhag 1 ( सृजन संवाद भाग १ )\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eSrujan Sanwad Bhag 2 ( सृजन संवाद भाग 2 )\u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : गोपाळ अवटी , प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49851657290050,"sku":null,"price":722.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/srujansanvadcombo.jpg?v=1743479055"},{"product_id":"vachan-वाचन","title":"Vachan ( वाचन )","description":"\u003cp\u003eतुम्ही स्वतःस साक्षर समजता ? तुम्ही नुसते शिक्षित कि सुशिक्षित ? तुम्ही स्वतःस चोखंदळ वाचक मानता ? तुम्ही तुमच्या वाचनावर कधी विचार केलात ? तुम्ही वाचनास काय मानता ? या सर्व प्रश्नांच्या तुमच्या उत्तराच्या कसोटीवर हे पुस्तक एकदा वाचून पहा. मग तुमच्या लक्षात येईल कि, आपली उत्तरे चुकीचीच होती.. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49851685404994,"sku":"BHAG0013","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vachan-F.jpg?v=1743479054"},{"product_id":"arthabhan-अर्थभान","title":"Arthabhan ( अर्थभान )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअर्थभान\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e' अर्थभान ' या पुस्तकातील विविध लेख कुटुंब, शेती, उद्योग, व्यवसाय , व्यापार त्याबरोबरच सहकार, बँकिंग अशा विविध प्रश्नाशी भिडणारे व त्यावर उपाय सुचविणारे आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50476305580354,"sku":"BHAG0010","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/arthbhan-F.jpg?v=1743852471"},{"product_id":"postmortem-of-postmortem","title":"Postmortem of Postmortem ( पोस्टमार्टम ऑफ पोस्टमार्टम )","description":"\u003ch4\u003ePostmortem Of Postmortem\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eडॉ. ननावरे यांचे ' पोस्टमार्टम ' हे पुस्तक वैद्यकीय आणि कायदेशीर दृष्ट्या पोस्टमार्टम विषयी माहिती देणारे आहे. या पुस्तकात पोस्टमार्टमच्या विविध पैलूंचा , विशेषतः वैद्यकीय आणि कायदेशीर बाबींचा, विचार आहे आणि त्यावर प्रकाश ही टाकला आहे . \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50922169696578,"sku":"9788198716859","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/104-postmartumofpostmartam-F.jpg?v=1750319440"},{"product_id":"asargandh-असरगंध","title":"Asargandh ( असरगंध )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअसरगंध\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'असरगंध ' या कविता संग्रहात कवीनं आजवर जी विचारांची कुपी राखून ठेवली होती, त्यांच्या मनात जे  भाव साठले होते ते व्यक्त केले आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51080608547138,"sku":"9788198716897","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/26asargandh-F.jpg?v=1754564913"},{"product_id":"bhashan-kala-भाषण-कला","title":"Bhashan Kala (भाषण कला )","description":"\u003ch4 class=\"a-spacing-none a-text-normal\"\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"8bjfze-pwqzco-sql0lr-qawchj\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eभाषण कला- व्यासपीठावर बोला आत्मविश्वासाने\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eभाषणासाठीची नवी अन सोपी सूत्रे तसेच परिपूर्ण तयारी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक :भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51089604510018,"sku":"9788195988730","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/38bhashankala-F.jpg?v=1754728999"},{"product_id":"tuzyachsathi-तुझ्याचसाठी","title":"Tuzyachsathi (तुझ्याचसाठी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eतुझ्याचसाठी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकविता हा अंतरात्म्याचा आवाज असतो. कवी कवितेतून बोलत असतो. वाचक कवितामय होऊन वाचत असतो. अशावेळी कवीचे आणि वाचकाचे एक नाते निर्माण होते. कवीची प्रतिभा आणि त्याच्या कवितेतली प्रतिमा यांचे काही रूप त्यात आलेले असते. सहजता-गंभीरता-एकरूपता या सगळ्यातून संवेदनांना स्वतंत्र रूप देऊन केलेली मांडणी वेगळ्या पद्धतीने आलेली असते. इथे केवळ कवीचे व्यक्त होणे आणि ते अनुभवणे महत्त्वाचे असते. कवितेतून कवीचे जगणे जसे व्यक्त होते आहे, तसेच ते कवितेतून येते आहे.किंबहुना जगण्याच्या तात्विक अधिष्ठानाला कवितेतून मांडता यायला हवे. या अर्थाने कवी हा स्वानुभवातून आपला जीवनप्रवास व्यक्त करत असतो. -\u003cstrong\u003e- डॉ. चंद्रकांत पोतदार मराठी विभागप्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक :भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51089608016194,"sku":"9788198124050","price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/39tuzyachsathi-f.jpg?v=1754729474"},{"product_id":"arthatarang-अर्थतरंग","title":"Arthatarang ( अर्थतरंग )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअर्थतरंग\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअर्थव्यवस्थेत निर्माण होणारे अर्थतरंग खूप हळुवारपणे आणि कौशल्याने मांडण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न म्हणजे 'अर्थतरंग ' हे पुस्तक. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक :  भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51089762910530,"sku":"9788198716866","price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/40Arthtarang-F.jpg?v=1754733144"},{"product_id":"dr-dam-bhag-3-डॉ-डॅम-भाग-३","title":"Dr. Dam – Bhag 3 (डॉ. डॅम - भाग ३)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. डॅम - भाग ३\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉक्टर डॅम भाग-३, डॅम व खोटा खुनी ही प्रदीर्घ कथा किंवा क्राईम कादंबरी आहे. यापूर्वीचे डॉ. डॅम-१ व डॉ. डॅम-२ हे कथासंग्रह होते तर डॉक्टर डॅम भाग-३ (खोटा खुनी) ही कादंबरी जरी काल्पनिक असली तरी फॉरेन्सिक सायन्स व त्याचा उपयोग खरा आहे. अंतर्गत तपासणी, ऊतकांचे नमुने, मृत्यूचे कारण ठरवण्यासाठी पोस्टमार्टम केले जाते. नैसर्गिक मृत्यू आणि अनैसर्गिक मृत्यू व त्यातच गुन्हेगारींचा तपास करण्यासाठीच पोस्टमार्टमची गरज लागते. ह्यामध्ये पोलिस पंचनामा आणि डॉक्टरांचे रिपोर्ट ह्यांचे महत्व येथे अधोरेखित होते. या कथेत सांगितलेले क्राईम जगात कुठेही घडू शकतात. खुनी माणूस कितीही हुशार असला तरी, तो चुका करतोच व त्याला शिक्षा करता येतेच हा संदेश या पुस्तकात दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. कुमार ननावरे \u003cbr\u003eप्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51862632137026,"sku":"9788199304406","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DoctorADetectiveF.jpg?v=1768977850"},{"product_id":"me-sarkari-doctor-save-medical-profession","title":"Me Sarkari Doctor : Save Medical Profession (मी सरकारी डॉक्टर : सेव्ह मेडिकल प्रोफेशन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमी सरकारी डॉक्टर : सेव्ह मेडिकल प्रोफेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविदारक सत्याचे मानगुटीवर बसलेले भूत पिच्छा सोडण्यास तयार नाही. मी स्वतः डॉक्टर आहे आणि संस्थेत आलेल्या कुष्ठरुग्णांच्या स्वास्थ्यसेवेत जवळजवळ चार दशके व्यतित केलेली आहेत... साहजिक शासकीय हितशत्रुच्या चीड आणणाऱ्या अपमानास्पद वर्तणुकीचा प्रतिकार आजच्या घडीला करावा लागतो आहे. भ्रष्टाचारमुक्त वडिलांच्या मळलेल्या वाटेवर आपण आपली पावले ठामपणे रोवलीत.. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता मनाला भावले... पटले... ते लेखणीतून वाचकांसमोर मांडले.... मला व्यक्तिशः आपला नितांत आदर अन् अभिमान वाटतो. पुस्तकांच्या विश्वात रमणारा... त्यांच्या सहवासात सभोवतालचे जग विसरून वाचनात दंग होणारा एक सर्वसामान्य वाचक! गेल्या काही वर्षापासून दैनंदिन कामाच्या व्याप्यात आणि अतिथींच्या वर्दळीने उसंत पारखी झाली आहे पण सवड मिळाली की पुस्तकांचा मोह आजही आवरत नाही. मी सरकारी डॉक्टर... याला अपवाद नाही!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. कुमार ननावरे \u003cbr\u003eप्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51862658122050,"sku":"9788198716842","price":382.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MeSarkariDoctorF_4e6b0c52-5ce8-43f6-a5ab-f5d2bd286f89.jpg?v=1768978956"},{"product_id":"phera-janm-mrutyucha","title":"Phera Janm Mrutyucha (फेरा जन्म मृत्यूचा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eफेरा जन्म मृत्यूचा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'फेरा जन्म मृत्यूचा' या संपूर्ण पुस्तकात विश्वास पाटील यांनी कालानुरूप समाजाने बदलत गेले पाहिजे, या सूत्रात खेड्याचा शोध घेतलेला आहे. यातील प्रत्येक लेख गावगाड्यातील प्रत्येक नवशिक्षित तरुणाने वाचायला हवा. यातून त्यांच्यात व गावगाड्यात बदल निश्चित होतील यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ गावगाड्याच्या अभ्यासकांना जसा उपयुक्त आहे तसाच महाराष्ट्राचे समाजशास्त्र कोणाला सिद्ध करावयाचे असेल, त्यास संदर्भ ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अधिक आहे. या तपशिलातूनच अभ्यासकांना महाराष्ट्राचे समाजशास्त्र नीटपणे मांडता येईल, हे विश्वास पाटील यांच्या या ग्रंथाचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे हा ग्रंथ पुढे कितीतरी वर्षे अभ्यासकांना मदतच करत राहील याची मला खात्री वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विश्वास शामराव पाटील \u003cbr\u003eप्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52088097145154,"sku":null,"price":202.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PheraJanmMrutyuchaF.jpg?v=1771914062"},{"product_id":"swataha-palikade","title":"Swataha Palikade (स्वतः पलीकडे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्वतः पलीकडे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपली स्वप्ने, कर्तृत्व विकसित करताना आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवून विचार करत असतो. हे 'स्वतःमधील गुंतणे' बऱ्याचदा अगदी नकळतपणे होत असते. त्यातून तयार होणारा जीवनपट आपल्याला स्वतः ची अशी एक 'सुरक्षित गुहा' प्रदान करत असतो. मात्र, सजगता जसजशी वाढू लागते तसतसे 'स्वतः पलिकडे' जाण्याचे प्रयत्न सुरू होतात. असाच स्वतःला व भोवतालाला स्वतः पलिकडे जाऊन निरखण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न म्हणजे लेखिका सुषमा शितोळे यांचे हे पुस्तक. आपले विचार, भावना, आयुष्यात घेतलेले बरोबर-चूक निर्णय, भोवताली घडणाऱ्या घटनांना दिलेले त्या त्या वेळचे प्रतिसाद आणि या सर्वातून 'घडत गेलेली दृष्टी' असा पट विविध लेखांमधून लेखिका इथे आपल्याला उलगडून दाखवते. समाजात वावरताना अनेक द्वंद्व तिने प्रत्यक्ष हाताळलेले आहेत. श्रद्धा - परंपरा पाळाव्यात की आधुनिकता जोपासावी, प्रेमभाव श्रेष्ठ की माझे मीपण, व्यवहार सांभाळावा की माणुसकी, नाती की करिअर, भावना की विवेक, लोभ की समाधान, मैत्र की लोक काय म्हणतील अशा अनेकविध प्रश्नांचा सामना तिने संवेदनशीलतेने केलेला आहे. म्हणूनच 'स्वतः पलिकडे' मधील लेख आपल्या समुदायाचे व परिसराचे विविध कंगोरे आपल्याला अधिक ठळकपणे उलगडून दाखवताना दिसतात. परिपूर्णतेचा आव न आणता केलेले हे तिचे अनुभवसमृध्द लिखाण आपल्याला अंतर्मुख करते. जीवनात 'प्रवाही राहण्याचे' महत्त्व त्यातून अधोरेखित होते. सरल आणि ओघवत्या शैलीतील हा लेखन-संवाद वाचकाला स्वतः पलिकडे जाण्यास उद्युक्त तर करेलच\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुषमा शितोळे \u003cbr\u003eप्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52088137974082,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SwatahaPalikadeF.jpg?v=1771914580"},{"product_id":"pustake-sad-ani-dad","title":"Pustake : Sad Ani Dad (पुस्तके : साद आणि दाद)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपुस्तके : साद आणि दाद\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी साहित्यात आता पुस्तकांवरची पुस्तके काढण्याची प्रथ मूळ धरू पाहत आहे, अशा पुस्तकांना वाचक, प्रकाशक मिळतात, ही फार आश्वासक बाब आहे. 'पुस्तके साद आणि दाद' हे पुस्तकही असाच साहित्यझरोका. या पुस्तकात इतिहास, वाङमय विचार, संस्कृती, प्रेरणा, निसर्ग, आरोग्य आणि समकालीन घडामोडींवर भाष्य करणाऱ्या वैचारिक पुस्तकांवरची आस्वादक समीक्षा आहे. 'The more I read, the more I acquire, the more certain I am that I know nothing' अशा शब्दांत समजेच्या मर्यादांना व्होल्टेअरसारख्या दिग्गजाने शब्दरूप दिले असेल, तर आपले वाचनप्रेम त्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे, याची विनम्र जाणीव लेखकाला आहे. पुस्तकांची निवड आणि लेखकाची भाषाशैली यावरून लेखकावरील वाचनसंस्कारांचा प्रत्यय येतो. लेखक एखाद्या पुस्तकाची केवळ सुरुवात करत असतो, ते शेवटाला नेणे वाचकांच्या हातात असते, काहीशा या भावनेसह या पुस्तकाचे सुकाणू लेखकाने वाचकांच्या हाती सोपवले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर \u003cbr\u003eप्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129074905410,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PustakeSaadAaniDaadF.jpg?v=1772790460"},{"product_id":"mantarlelya-divasanchi-bakhar","title":"Mantarlelya Divasanchi Bakhar (मंतरलेल्या दिवसांची बखर)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eमंतरलेल्या दिवसांची बखर\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकोल्हापूर आणि सांगली येथे असताना वासुदेव कुलकर्णी यांना दिल्ली, कर्नाटक, काश्मीर, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आदि प्रदेशात जाण्याची संधी मिळाली. त्यांची वार्तापत्रे त्यांच्या नावावर त्या त्या ठिकाणांहून प्रसिद्ध होऊ लागली. बऱ्याचदा त्यांनी आणि मी एकत्रच दौरे केलेले आहेत. त्यांना कोल्हापूरचा अभिमान असला आणि त्यांच्या भाषेत रांगडेपणा असला तरी त्यांची लिहिती भाषा सौम्य आणि प्रासादिक आहे. त्यांच्या भाषेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे ज्ञान आणि विज्ञान आहे आणि रामदासस्वामींचा जिव्हाळा आहे. संत तुकाराम महाराजांचे 'भले तरी देऊ कासेची लंगोटी' हे तत्वज्ञान आहे. हो, उगीचच कोणी त्यांच्या वाटेला गेले तर ते त्याची खोड मोडल्याशिवाय राहात नाहीत. त्यांच्या भाषेत जसेच्या तसे चित्र उभे करण्याची ताकद आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : वासुदेव कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : भागयश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52282244890946,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/mantarlechyadivsachyabakhar-f.jpg?v=1773568765"},{"product_id":"camerya-magchi-ti","title":"Camerya Magchi 'Ti'  (कॅमेऱ्या मागची 'ती')","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकॅमेऱ्या मागची 'ती'\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली आणि आज त्यांच्याच लेकी आकाश कवेत घेत निरनिराळ्या क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवत आहेत. महिलांच्या या प्रगतीचे दर्शन घडवणारे प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचे हे एक विशेष पुस्तक! काय आहे या पुस्तकात ? दिग्गज वारसाः भारतातल्या पहिल्या महिला व्यावसायिक छायाचित्रकार होमी व्यारावाला यांच्या जिद्दीचा इतिहास, ज्यांनी पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःची ओळख प्रस्थापित केली. याखेरीज त्यांच्या समकालीन अन्नपूर्णा दत्त यांचाही समावेश या पुस्तकात केलेला आहे. नवा संघर्षः काश्मीरमधल्या पहिल्या महिला वेडिंग फोटोग्राफर साहिबा वानी यांच्यासारख्या रणरागिणींचा प्रवास, ज्यांनी साचेबद्ध विचारांना छेद देऊन हृदयस्पर्शी 'फोटो स्टोरीज' विकसित केल्या. प्रेरणादायी यशोगाथाः एकूण ४० महिला छायाचित्रकारांच्या कहाण्या ज्या केवळ माहिती देत नाहीत, तर नव्या पिढीला जगण्याची नवी दृष्टी आणि प्रेरणा देतात. का वाचावे ? काही परिचित तर काही नवीन, पण प्रत्येकीची जिद्द अफाट ! स्त्रीवादी विचारांना कृतीची जोड देणाऱ्या या महिलांच्या ह्या यशोगाथा मनाला आणि हृदयाला भिडणाऱ्या आहेत, हे नक्की! आज सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांना आपल्या लेकींना या उंचीवर पाहून नक्कीच अभिमान वाटला असता. अडथळ्यांची शर्यत पार करून स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या या महिला छायाचित्रकारांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक कलाप्रेमीने आणि वाचकाने आवर्जून वाचावा असाच आहे! महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील महिला फोटोग्राफर्सच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारे प्रवीण घोडेस्वार यांचे हे पुस्तक म्हणजे वेगळ्या वाटेवरल्या स्त्रियांच्या कामगिरीचा मौलिक असा दस्ताऐवज आहे, यात शंका नाही !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. प्रवीण घोडेस्वार \u003cbr\u003eप्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52977299325250,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CameraMagachiTiF.jpg?v=1777363523"},{"product_id":"engineers-ghadavtana","title":"Engineers Ghadavtana (इंजिनिअर्स घडवताना...)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eइंजिनिअर्स घडवताना... \u003cbr\u003e\u003c\/strong\u003eएक अनुभवसंपन्न प्रवास\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\"अभियांत्रिकी प्रशिक्षण क्षेत्रात गेली ३३ वर्षे अखंड कार्यरत असलेले माझे स्नेही श्री. शैलेश कुलकर्णी यांचे 'इंजिनिअर्स घडवताना... एक अनुभवसंपन्न प्रवास' हे पुस्तक त्यांच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीला उत्तम आढावा घेणारं अप्रतिम लेखन आहे. घरातून व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शून्यातून निर्माण केलेली संस्था नावारूपास आणणे आणि अनेक वर्षे ती प्रतिमा जपणे, हे निव्वळ विस्मयकारक आहे. कुलकर्णी सरांची व त्यांच्या सहकारी शिक्षकांची प्रामाणिक व अखंड मेहनत तसेच सचोटीपूर्ण व्यवहार यामुळे या संस्थेची प्रतिमा जनमानसात कायमच विश्वासार्ह राहिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे या विलोभनीय प्रवासाची सफर घडविणारा एक मोलाचा दस्तऐवज आहे. मोलाचं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संग्रही असायलाच हवा असा आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e- प्रा. (डॉ.) विनय भोळे\u003c\/strong\u003e \u003cbr\u003eप्राचार्य, एम. एल. डहाणूकर कॉलेज \u003cbr\u003eऑफ कॉमर्स (स्वायत्त), विलेपार्ले, मुंबई\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : शैलेश कुलकर्णी \u003cbr\u003eप्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54534879412546,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/EngeeniarsGhadavtanaF.jpg?v=1781249017"},{"product_id":"kalya-jopastana","title":"Kalya Jopastana (कळ्या जोपासताना)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकळ्या जोपासताना \u003cbr\u003eसेव्ह बेबी गर्ल \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"वैद्यकीय क्षेत्रातील वास्तव आणि सामाजिक संघर्षाचा आरसा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रशासकीय यंत्रणा, कायदे आणि सामाजिक मानसिकता यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका प्रामाणिक सरकारी डॉक्टरचा अनुभवप्रवास म्हणजे 'कळ्या जोपासताना'. कोल्हापूरचे डॉ. कुमार ननावरे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून शासकीय आरोग्य व्यवस्थेतील 'काळ्या' बाजूंवर प्रकाशझोत टाकला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात काय वाचायला मिळेल?\u003cbr\u003eस्त्रीभ्रूणहत्या आणि गर्भलिंग निदान: या राष्ट्रीय मोहीमा राबवताना यंत्रणेतील त्रुटी, येणारा दबाव आणि मिळणाऱ्या धमक्यांचे थरारक वास्तव, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशासकीय अनास्था: अपुरे मनुष्यबळ आणि साधनांची कमतरता असूनही कर्तव्यपूर्तीसाठी केलेली धडपड.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसुरक्षित गर्भपात: बोगस डॉक्टरांकडून होणारे जीवघेणे प्रकार आणि त्यामागील सामाजिक परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसहकाऱ्यांमधील नाते: स्त्री-पुरुष सहकाऱ्यांच्या मैत्रीकडे पाहण्याचा समाजाचा संकुचित दृष्टीकोन आणि त्यातून उद्भवणारे मानसिक छळ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यवस्था सुधारायची तर अशा अप्रकाशित बाजू समाजासमोर मांडण्याचे धाडस कोणीतरी करावे लागते. तसा प्रयत्न केल्याबद्दल लेखक व प्रकाशकांचे कौतुक!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e- प्रा. डॉ. रूपा शहा \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. कुमार ननावरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54534910247234,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KalyaJopastanaF.jpg?v=1781251647"},{"product_id":"irsal-kokanrang","title":"Irsal Kokanrang (इरसाल कोकणरंग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eराजा बर्वे \u003cbr\u003eइरसाल कोकणरंग \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोकणची माणसं करवंटीतल्या खोबऱ्यासारखी.. लाल मातीतल्या फुरश्याच्या चालीची, सडयावरच्या कातळासारखी, आगरातल्या खोल बावडीसारखी गावदेवीच्या टक्क उघड्या डोळ्यांनी जग पाहाणारी आणि गावाबाहेरच्या देवराईसारखीच गप्प मिटून पडणारी! कोकणची माणसं नमन-खेळ्यातल्या गॅसबत्यांसारखी मृदूंगाच्या बोवंडासारखी, पायरहाटाच्या माळेसारखी, चिलमीत फाकफकणाऱ्या राखेसारखी, भजनातल्या  झांजांसारखी आणि पडवीतल्या लयीत कुरकुरणाऱ्या  झोपाळ्यासारखी! कोकणची माणसं फणसाच्या चिकासारखी.. काजू-आंबा-करवंदाच्या रंगांची, उतरत्या गावठी नळ्यांतून उठणाऱ्या धुरासारखी, म्हसोबा-साळकाई-माळकाईच्या अनिर्णित कौलासारखी, आमराईमागच्या नदीतल्या कोंडीसारखी आणि शुल्केश्वरासमोरच्या दरियाच्या उफानासारखीही! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e- मनोज कोल्हटकर \u003cbr\u003eलेखक, नाटककार, अभिनेता  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. कुमार ननावरे \u003cbr\u003eप्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54535470743874,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/IRSAALKOKANRANGF.jpg?v=1781268656"},{"product_id":"dr-dam-sarpadansh-part-1","title":"Dr. Dam Sarpadansh Part 1 (डॉ. डॅम भाग १ (सर्पदंश))","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. डॅम  भाग १\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e(सर्पदंश)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ.डॅम  अर्थात \"डॉक्टर -अ मेडिकल डिटेक्टिव्ह\" ही व्यक्तिरेखा अचानक सुचली.आजवर क्राईमस्टोरीज \u003cbr\u003eवर अनेकानेक पुस्तके, वेबसिरीज, टीव्ही सिरिअल्स व चित्रपट झाले, परंतु मुख्य भूमिकेत डॉक्टर \u003cbr\u003eअसलेल्या कथा तशा विरळया . खुनाच्या खटल्यात आय-व्हिटनेम महत्वाचे असले तरी बहुतांश वेळेस ते \u003cbr\u003eमिळत नाहीत. पोलीस आरोपी पकडतात, आरोपी गुन्हा कबूल करतात, परंतु कोर्टामध्ये गुन्हाकबुली ग्राह्य धरली जात नाही .\u003cbr\u003eवकील कबुलीजवाब खोटा सिद्ध करत आरोपीची निर्दोष सुटका करवतो .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही केसेसमध्ये फॉरेन्सिक एक्स्पर्ट परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करू शकतात.तपासण्या व पुरावे \u003cbr\u003eगोळा करून खुन व आरोपी यांचा संबंध भक्कमपणे सिद्ध करता येतो.पुस्तकातील \"बारा कथा\" केवळ वाचकांच्या \u003cbr\u003eमनोरंजनासाठी नसून मेडिकल ऑफिसर, वकील व पोलिसांना पूरक ठरतील अशी अपेक्षा. सर्व कथा सत्य घटनेवर आधारित असून,\u003cbr\u003eकाही वर्तमानपत्रात ,इलेक्ट्रॉनीक मिडीयावर व युट्युबवर पाहण्यात आल्या आहेत. या सर्व कथांमधून एक गोष्ट मात्र प्रकाशाने जाणवली,\u003cbr\u003eयांत कुठेही फॉरेन्सिक डॉक्टरचा उल्लेखच नव्हता. पुस्तकातील कथांतून मी ही दरी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन    \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54536709013826,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Dr.dampart1F.png?v=1781328045"},{"product_id":"dr-dam-va-kali-jadu-part-2","title":"Dr. Dam va Kali Jadu Part -2 (डॉ. डॅम  भाग २ (डॉ. डॅम व काळी जादू ))","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. डॅम  भाग २\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e(डॉ. डॅम व काळी जादू )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचकांना डॉ.डॅम (भाग-२) अर्थात डॉ डॅम व काळी जादू, हे लेखकाचे दुसरे पुस्तक उपलब्ध करून \u003cbr\u003eद्यायला मिळाले याबद्दल आनंद वाटत आहे. जगात व देशात अनेक क्राईम स्टोरीज लिहिल्या गेल्या आहेत.\u003cbr\u003eपरंतु फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून एक डॉक्टर प्रमुख भूमिकेत असलेल्या वेब सिरिज कमीच. आरोपी ने गुन्हा कबुल केला तरी, भारतीय पुरावा कायदे कलाम २४ व २५ नुसार कोर्टात मान्य केला जात नाही. हुशार वकील हा जवाब खोटा असून दबावाखाली घेतला आहे,\u003cbr\u003eअसे सिद्ध करू शकतो व आरोपी निर्दोष सुटू शकतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु फॉरेन्सिक तज्ज्ञ, परिस्तिथी जन्य पुरावे गोळा करून, आरोप सिद्ध करू शकतो, हेच ह्या ९ कथा मध्ये लिहिले आहे. ह्या सर्व खून कथा\u003cbr\u003eसत्य घटनांवर आधारित आहेत पण लेखक म्हणून त्यात थोडा रंजकपणा आणायचा प्रयत्न केला आहे. लेखकाच्या  मते अश्या प्रकारचे लिखाण \u003cbr\u003eमराठी मध्ये व देशामध्ये पहिल्यांदाच लिहिले गेले असावे. लवकरच \"भाग-३ खोटा खुनी \" ही दीर्घ कथा प्रकाशित करण्याची योजना आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54536758395202,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Dr.dampart2F.png?v=1781329676"},{"product_id":"dr-dam-va-kavtiche-rahsya-part-4","title":"Dr. Dam va Kavtiche Rahsya Part-4 ( डॉ. डॅम  भाग ४ (डॉ. डॅम व कवटीचे रहस्य ))","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. डॅम  भाग ४\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e(डॉ. डॅम व कवटीचे रहस्य  )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडोसा किंग उर्फ चिंतन तंगडी उर्फ शेट्टी ने डॉ.डॅम च्या वेर्णा कार चा नंबर व चेहरा CCTV फुटेजवरून कर्नाटकमधील हजारभर गुंड कार्यर्त्यांना, पाठवलेला असतो, पाठलाग करून लक्ष ठेवायला अन वेळ आलीच तर संपवायला, त्यामुळे डॉ.डॅम जादुई वेर्णा घरी ठेवतो व जादुई बुलेट व जादुई डिटेक्टिव्ह अँपरेल  घालून एकटाच निघतो डोसा किंगला भिडायला व डोसा किंगचा सभ्य खुनी चेहरा उघडा पाडून तुरुंगात डांबायला कारण कवटीच्या मागे डोसा किंगच असतो .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ.डॅम  डोसा किंगच्या साम्राज्यात जाऊन त्याचा खुनी चेहरा उघडा करतो का???? की फेल होतो??? वाचा -कवटी चे रहस्य -\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन  \u003c\/strong\u003e   \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54536891597122,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Dr.dampart4F.png?v=1781331053"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/bhagyashree-prakashan.oembed?page=2","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}