{"title":"Pro. Shyam Manav","description":"\u003cp\u003ePro. Shyam Manav books\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"buwabaji-fakt-fasavegiri","title":"Buwabaji : Fakt Fasavegiri (बुवाबाजी : फक्त फसवेगिरी !)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबुवाबाजी : फक्त फसवेगिरी !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्यसाईबाबा, आनंदीमाता, सदाचारीबाबा, नैनोदचा बाबा, गुलाबबाबा, सुंदरदासबाबा असे देशभरात शेकडो बुवाबाबा होवून गेले आणि त्यांच्या नागरिकांना फसवण्याच्या पध्दतीसुध्दा वेगवेगळ्या होत्या. आजही असे अनेक बुवाबाबा अस्तित्वात आहेत. विविध चमत्कारांमुळे असे बुवा-बाबा, नावारुपाला आले पण,\u003cbr\u003eखरंच कुणी चमत्कार करु शकतो का?\u003cbr\u003eभूत-भविष्य - वर्तमान सांगू शकतो?\u003cbr\u003eकुणात दैवी शक्ती असते?\u003cbr\u003eमंत्र-तंत्राने कुणी असाध्य रोगांची दुरुस्ती करु शकतो का?\u003cbr\u003eमंत्राने होणाऱ्या मुलीचा मुलगा करु शकतो का?\u003cbr\u003eमहिलांच्या लैंगिक शोषणासाठी कशाप्रकारे या कथित चमत्कारांचा उपयोग केला जातो?\u003cbr\u003eचमत्कारांसाठी हे बुवा- मांत्रिक लोक कोणत्या क्लुप्त्या वापरतात?\u003cbr\u003eपोथ्यांमध्ये दिलेले चमत्कार खरे असतात का?\u003cbr\u003eखरंच कुणाला सिद्धी प्राप्त होते का?\u003cbr\u003eअंधश्रद्धांचा मूळ आधार काय आहे?\u003cbr\u003eअशा भानामती संबंधीच्या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या सर्व महाराष्ट्रात घडलेल्या सत्य घटना आहेत ज्या प्रा. श्याम मानवांनी हाताळल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. श्याम मानव \u003cbr\u003eप्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52270772977986,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BuwabajiF.jpg?v=1773207985"},{"product_id":"jyotishshastra-nashib-khare-ki-khote","title":"Jyotishshastra : Nashib Khare Ki Khote ? (ज्योतिषशास्त्र : नशीब, खरे की खोटे ? )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eज्योतिषशास्त्र : नशीब, खरे की खोटे ? \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिषशास्त्राचे किंवा ज्योतिष सांगणाऱ्यांचे सद्यस्थितीत देशभरात जरी स्तोम माजलेले दिसत असले तरी अनेक लोकांच्या मनात ज्योतिष फलज्योतिषाबद्दल असंख्य प्रश्न आहेत. देशभरात लोकांमध्ये आपले नशीब जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. खुपच कमी लोक असतील ज्यांनी आपल्या मुलाची\/मुलीची कुंडली बनवली नाही.\u003cbr\u003eहे भविष्य सांगणारे ज्योतिषी कशाचा आधार घेवून भविष्य सांगतात? कुंडली बनवतात?\u003cbr\u003eज्योतिषशास्त्र नेमकं कोणत्या सिध्दांतांवर चालतं?\u003cbr\u003eहस्तसामुद्रिक, मुद्रासामुद्रिक, अंकसामुद्रिक म्हणजे काय?\u003cbr\u003eनशीब-ज्योतिष खरं असतं की खोटं?\u003cbr\u003eकर्मवीपाक सिद्धांत म्हणजे काय?\u003cbr\u003eनशीब-ज्योतिषावर कीतपत विश्वास ठेवला पाहिजे?\u003cbr\u003eआपले भुत-भविष्य-वर्तमान हे आधीच ठरलेले असतात का?\u003cbr\u003eब्रम्हांडातील ग्रह-ताऱ्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का? जर होतो तर कसा?\u003cbr\u003eकुंडली खरी असते का?\u003cbr\u003eदेशभरातील ज्योतिषांना प्रा. श्याम मानवांनी कोणती आव्हाने दिली आहेत?\u003cbr\u003eज्योतिषकथनाचे जे अनेक प्रकार आहेत ते प्रकार कोणते?\u003cbr\u003eज्योतिष हे विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरते का?\u003cbr\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरे आणि गेल्या 40 वर्षांत अंधश्रध्देविरुध्द लढताना प्रा.श्याम मानवांचा अनेक लहान-मोठ्या ज्योतिषांसोबत प्रत्यक्ष संबंध आला त्याबद्दलचे विविध अनुभव ह्या सर्व गोष्टींची इत्यंभुत माहिती म्हणजे हे पुस्तक. ज्योतिषशास्त्राविषयी तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेचे समाधान म्हणजे हे पुस्तक..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. श्याम मानव \u003cbr\u003eप्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52270786740546,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JyotishshastraF.jpg?v=1773208684"},{"product_id":"buwa-tethe-baya","title":"Buwa Tethe Baya (बुवा तेथे बाया)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबुवा तेथे बाया\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाजातील लंपट बुवा-बाबा-बापूंना मोठी प्रतिष्ठा आणि अमाप पैसा मिळाला की त्यांचं अंतिम ध्येय असतं ते विविध महिलांना उपभोगणे. पण अशा ढोंगी बुवा-बाबांना ओळखण्यात अनेकांचा गोंधळ होतो.\u003cbr\u003eहे बुवा-बापू महिला भक्तांना कसे भजनी लावतात ?\u003cbr\u003eत्यांना कोणती प्रलोभने देतात ?\u003cbr\u003eतरुण महिला अशा वयस्कर बाबांच्या प्रलोभनांना का बळी पडतात?\u003cbr\u003eहे ढोंगी बुवा-बाबा समाजातील सर्वच घटकातील स्त्रियांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात ?\u003cbr\u003eकसे महिलांना जाळ्यात ओढतात ?\u003cbr\u003eअशा बुवाबाबांना कसे ओळखायचे?\u003cbr\u003eत्यांना उघडे कसे पाडायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक आहे.\u003cbr\u003eअनेकांच्या जीवनात त्यांच्यासमोर अशा काही घटना घडल्या असल्याने त्या खऱ्या की खोट्या या व्दिधा मनस्थितीत असे लोक असतात. प्रा. श्याम मानवांना शुकदास, सत्यदेव, व्यंकटनाथ, हजरतबाबा करामत अली, स्वामी विद्यानंद, गिरीपुंजे, कृपालूबाबा, सुंदरदास अशा अनेक नावाजलेल्या बाबा-महाराजांचे भांडाफोड करतांना आलेले अनुभव समजून घेण्यासाठी आणि आसाराम-रामरहिम पर्यंत सर्व बाबांच्या लोकांना फसविण्याच्या पध्दती प्रत्यक्ष उदाहरणांसह जाणून घेण्यासाठी महत्वाचा ग्रंथ.. कारण हे काल्पनिक लिखाण नाही तर लेखकाने स्वतः अनुभवलेल्या घटना आहेत. या घटनांमधील अनेक पात्रे तर आपल्याही ओळखीची असतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. श्याम मानव \u003cbr\u003eप्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52270811054402,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BuwaTetheBayaF.jpg?v=1773209268"},{"product_id":"andhashraddheche-vaadal-vividh-prakarachya-andhashraddhancha-magova","title":"Andhashraddheche Vaadal: Vividh Prakarachya Andhashraddhancha Magova (अंधश्रद्धेचे वादळ : विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचा मागोवा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअंधश्रद्धेचे वादळ : विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचा मागोवा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाजात अंधश्रध्दांचे प्रकार कोणकोणते आहेत?\u003cbr\u003eभुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्थरचे वास्तव काय आहे?\u003cbr\u003eमांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात?\u003cbr\u003eपोटातील मुलीचे रुपांतर मुलात करणाऱ्या बाबाचे वास्तव काय आहे?\u003cbr\u003eकोंबडीचे संमोहन काय असते?\u003cbr\u003eअंधश्रध्दा पसरविणाऱ्या बनावट टिव्ही मालिकांची प्रा. श्याम मानवांनी कशी चिरफाड केली?\u003cbr\u003eप्रा.श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले?\u003cbr\u003eविविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रध्दांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?\u003cbr\u003eअशा विषयांबद्दलची अचूक माहिती उदाहरणांसह जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. श्याम मानव \u003cbr\u003eप्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52270891139394,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AndhshradhhechevadalF.jpg?v=1773210016"},{"product_id":"andhashraddheche-mayajaal","title":"Andhashraddheche Mayajaal (अंधश्रद्धेचे मायाजाळ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअंधश्रद्धेचे मायाजाळ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंमोहनाव्दारे आपण कोणकोणत्या गोष्टी करु शकतो?\u003cbr\u003eया जगात खरंच भुत अस्तित्वात असते का?\u003cbr\u003eआत्मा असतो का?\u003cbr\u003eप्लँचेटव्दारे आपण आत्म्याशी बोलू शकतो का?\u003cbr\u003eचमत्कार खरेच कुणी करू शकतो का?\u003cbr\u003eलोकांना चकवा कसा लागतो?\u003cbr\u003eमाणसाच्या अंगात देवी-देवता खरंच येतात का?\u003cbr\u003eस्त्रियांच्या अंगात देवी येण्याची नेमकी कारणे काय?\u003cbr\u003eकरणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय? ते कशाप्रकारे केले जाते?\u003cbr\u003eनिखाऱ्यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते?\u003cbr\u003eसाप-विंचू हे मंत्राने उतरतात का?\u003cbr\u003eएकटा माणूस 12 बैलगाड्या कसाकाय ओढू शकतो?\u003cbr\u003eअशा सर्व प्रश्नांमागचे रहस्य उलगडणारे हे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. श्याम मानव \u003cbr\u003eप्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52271033319746,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AndhshradhhecheMayajalF.jpg?v=1773211478"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/pro-shyam-manav.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}