{"title":"Varnamudra Publishers","description":"\u003cem data-mce-fragment=\"1\"\u003eVarnamudra Publishers Books\u003c\/em\u003e","products":[{"product_id":"pap0003-beket","title":"Beket (बेकेट)","description":"आजच्या संदर्भातही बेकेट यांचे साहित्य कसे महत्वाचे आहे हे एका चर्चासत्रातुन समजत गेले.पुस्तकरुपाने ते निबंध येत आहेत ही एक चांगलीच गोष्ट आहे.जगभरातल्या थोर लेखकांची अशी आकलने आवश्यकच आहेत.ती आपली वाचनाची कक्षा आणि समृधी वाढवणारी असतात यात शंका नाही.\n\u003ctable\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Ganesh Kanate\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePublisher\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Varnamudra\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Hardbound\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:132\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Marathi\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:2019\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46053431247170,"sku":"PAP0003","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/105339_1.jpg?v=1743482188"},{"product_id":"tattvabhan-तत्त्वभान","title":"Tattvabhan  ( तत्त्वभान  )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eTattvabhan  ( तत्त्वभान  )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Shriniwas Hemade\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'तत्त्वज्ञान ' ह्या विषयाशी बिनचूक राहणाऱ्या कोणाही माणसाने ह्या पुस्तकाची काही पाने चाळली तरी तो निश्चित 'तत्त्वप्रेमी' होईल, असे हे पुस्तक आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eIt is Published By :  \u003cem data-mce-fragment=\"1\"\u003eVarnamudra Publishers\u003c\/em\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":47599526773058,"sku":"9788196418601","price":612.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Tattvbhan-F.jpg?v=1743480062"},{"product_id":"lakadi-pool-te-london-pool-aani-anyatra-लकडी-पूल-ते-लंडन-पूल-आणि-अन्यत्र","title":"Lakadi Pool Te London Pool Ani Anyatra ( लकडी पूल ते लंडन पूल आणि अन्यत्र )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eलकडी पूल ते लंडन पूल आणि अन्यत्र\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रवासवर्णन, साहित्यिक व त्यांच्या कलाकृती यांचा सुरेख संगम आपण साधला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51089421402434,"sku":"9788196287337","price":436.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/35lakadipultelondalpul-F.jpg?v=1754727055"},{"product_id":"chandanachi-shidi","title":"Chandanachi Shidi (चंदनाची शिडी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचंदनाची शिडी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रिय सर,  माझ्या हिंदी इतकंच तुमचं मराठी वाईट असल्यानं आपण एकमेकांना खूप हसायचो. पण जातांना थोपटत तुम्ही मला आश्वस्त करायचे की, हिंदी हिंदी होती है भईया वो टुटीफुटी नहीं होती. और तुम्हारी टुटीफुटी है तो मेरी भी वैसीही है. मोजक्या चार पाच भेटींत आणि फोनवर आपण किती किती बोललो. कमल ताई असतानाचे तुम्ही आणि त्या गेल्यावरचे तुम्ही अशी तुमची दोन्ही रूपं पाहिलीत. तुम्हांला काही लपवता यायचं नाही. लपविण्यासारखं आहेच काय माझ्यापाशी, असं तुम्ही म्हटलंच आहे. खैर, तुम्ही असताना हे पुस्तक आलं असतं तर तुम्हांला मनातून आनंद झाला असता. उज्जैनच्या तुमच्या अंगणात बसून पुस्तक उलटंपालटं करत तुम्ही मिश्कीलपणे म्हणाला असता - देखो अब महाराष्ट्र में पत्थर बरसेंगे, वो उज्जैन तक तो नहीं आएंगे सो अब तुम्हे ही झेलना पडेगे. आणि तुम्ही तोंडासमोर आडवी मूठ धरत उत्पल दत्तसारखे हा हा करत हसला असता, मी खो खो खिदळलो असतो. आवारातील तुमच्या पाच कुत्र्यांपैकी एखादा दचकून व वरमून तुमच्या पायाशी येऊन माझ्याकडे पाहत बसला असता. - आता ह्या सगळ्या राहून गेलेल्या आठवणींना.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. चंद्रकांत देवताले \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52913923653954,"sku":null,"price":211.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChandanachiShidiF.jpg?v=1775899817"},{"product_id":"nivdak-kavita","title":"Nivdak Kavita (निवडक कविता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनिवडक कविता\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकवितेला काहीतरी शोधून काढायचं असतं. कविता हा शोध घेणारा जीव आहे. जगातल्या, जीवसृष्टीतल्या माणसामाणसांच्या समूहासमूहाच्या आयुष्यकाळात अनेक गोष्टी घडतात. त्या घटनांची व्यावहारिक संगती कोणतीही मानवजात लावतच असते पण तिची पराव्यावहारिक संगतीही लागावी लागते. ते काम कविता करते. कविता ही क्रिप्टॉलॉजी असते. कवी हा क्रिप्टॉलॉजिस्ट असतो. कवितचे कवितापण तिच्या क्रिप्टॉलॉजित आहे. जगण्यात आणि जगात, जळींस्थळीं, काष्ठींपाषाणीं विस्मय भरलेला असतो. जग आणि जीवन हे विस्मयरूप आहे. त्या विस्मयाची अनेक रूपे माणसाला रोज भेटतात. त्यांना तो लक्षित किंवा दुर्लक्षित करत असतो. या सनातन विस्मयाचा उलगडा करणे कवितेचे काम असते. ही विस्मयाचा उलगडा करण्याची प्रेरणा म्हणजेच काव्याची प्रेरणा. ही प्रत्येक माणसात निसर्गतःच असते. हे विस्मय भाषादत्त असतात किंवा भाषातीतही असतात. सैन्यात शत्रूपक्षाचे बिनतारी संदेश पकडून ते उकलणारे किंवा सॉफ्टवेअरचे पासवर्ड मिळवणारे, सोर्सकोड हुडकून काढणारे किंवा ध्वनिशास्त्रात साउंडमधून 'नॉइज टू सिग्नल' असा एक रेश्यो असतो तो रेश्यो ओळखून 'सँपल साउंड'मधून त्यातला सिग्नल वाचणारे अन् विश्लेषित करून त्याचा अन्वयार्थ मांडणारे असे क्रिप्टॉलॉजिस्ट असतात. कवी हा असाच संस्कृतीचा क्रिप्टॉलॉजिस्ट असतो. कविता ही क्रिप्टॉलॉजी असते. संकेतभेद करणे हे कवीचे काम. आणि तो संकेतभेद केल्यावर पुन्हा त्याचा आशय किंवा अन्वयार्थ जवळपास स्वयंनिरपेक्ष (डिव्हाईस इंडिपेंडन्ट) स्वरूपात बांधणे, ते करताना भाषेच्या नियमांची, दंडुकेशाहीची फिकीर न करता, प्रसंगी अभिरुचीला छेद देत, वाचकाला अंतर्मुख करून त्याच्या जिज्ञासेचा प्रक्षोभघडवून आणणे हे काम कविता करते. कविता ही संकेतभेदाची विद्या आहे. ती नुसते शास्त्र नाही. ती नुसती कला नाही. ती विद्या आहे, जिच्यात शास्त्र आणि कला दोन्ही येतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सलील वाघ \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52913991090498,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NivadakKavitaF.jpg?v=1775900333"},{"product_id":"zennachya-kavita","title":"Zennachya Kavita (झेन्नाच्या कविता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eझेन्नाच्या कविता\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गोष्ट या पूर्वी कुणीही सांगितल्याचं काहीही आठवत नाही\u003cbr\u003eआणि या गोष्टीतली गोष्ट पुरातन असली तरी ती वाहत आली आहे आपल्यापर्यंत पण ती इथं थोडीच राहणार आहे तुंबून ती तर आपल्यातूनही जाणार आहे वाहून\u003cbr\u003eअगदी थेट वर्तमानाच्याही पुढं ज्या काळाचं आपण अद्यापही नामकरण केलेलं नाही\u003cbr\u003eतरीही ही गोष्ट मला सांगायची आहे\u003cbr\u003eबायांनो... थोडा वेळ निवांत बसा या रात्रीच्या पायरीवर\u003cbr\u003eअजूनही मला झोप येत नाहीये... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. दिनकर मनवर \u003cbr\u003eप्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52914057806146,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JhennachyaKavitaF.jpg?v=1775900919"},{"product_id":"bilamat","title":"Bilamat (बिलामत)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबिलामत\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचवदा वरसं जंगलानं फरार राह्यलो. कितीक खेप पोलिसाईनं हमले केले. एका हमल्यात बंदुकीच्या सहा गोया लागल्या. दोन जेवण्यापायाच्या मांडीतून आरपार निंगून गेल्या; दोन जेवण्याहाताच्या पंज्याले लागल्या! बोटाईचे सालर्ट सालटं उळले. त्या हातानं अजून काहीच करता येत नाही. पाठीतल्या गोया तं शेवटालोक काळता आल्या नाहीत. त्या तठीच घर करून राह्यल्या. त्येच्यातून वाचलो... अर आज एकोणीस वरसं जेलची सजा काटून लोकाईम्होरं बोलून राह्यलो... यवतमाळ-नांदेडच्या परिसरात एकेकाळी श्यामादादा कोलाम म्हणजे 'टेरर' होते. अपघातानं ते दरोडेखोर बनले. त्यांनी सावकारांना लुटलं आणि गरिबांना मदत केली. रझाकारांविरुद्धच्या लढ्यात ते उतरले आणि 'नाना पत्री'शी त्यांचा पत्रव्यवहार होता. खास वऱ्हाडी बोलीतील त्यांची ही चरित्रकथा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. दिनकर दाभाडे \u003cbr\u003eप्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52914101748034,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BilamatF.jpg?v=1775901376"},{"product_id":"bhasha","title":"Bhasha (भाषा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभाषा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"माझ्या लेखनाला वास्तवाचा भरभक्कम आधार आहे,\" असे विधान गाब्रिएल गार्सिया मार्केस ह्या श्रेष्ठ कादंबरीकाराने केलेले आहे. अर्थातच हा भरभक्कम आधार घेऊन मार्केसने मॅजिक रिअॅलिझमचे गारूड करून कथात्म लेखनप्रकारावर आपला अमीट ठसा उमटवला. पंकज कुरुलकर यांच्या कथा वाचताना वास्तवाच्या ह्या भरभक्कम आधाराची जाणीव ओळीओळींतून होतेच, परंतु त्या पायावर कुरुलकर आपले जे कथाशिल्प साकार करतात, ते वाचकांना स्तिमित करणारे आणि शेवटापर्यंत खेचत नेणारे असते, ह्याचाही प्रत्यय येतो. बहुप्रसवता हा कदाचित एखाद्या लेखकाच्या बाबतीत चिंतेचा आणि दुर्गुणाचा विषयही ठरू शकला असता, परंतु कुरुलकर इथेही विरुद्ध दिशेने चिंताजनक ठरतात. त्यांच्या आगामी लेखनप्रकल्पांविषयी जाणून घेताना हताशपणे 'आदमी एक और इतने सारे काम' ही लीलाधर जगुड़ींची ओळ अपरिहार्यपणे ओठांवर येते. 'वर्णमुद्रा' कुरुलकरांचे हे तिसरे पुस्तक प्रकाशित करताना अतिशय आनंदी असून, त्यांच्या पुढील लेखनप्रवासास शुभेच्छा देतानाच सक्रिय सहभागाची हमीसुद्धा देत आहे.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. पंकज कुरुलकर \u003cbr\u003eप्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003cbr\u003e  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52914183078210,"sku":"VARN0008","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BhashaF.jpg?v=1775902295"},{"product_id":"srujanstrot","title":"Srujanstrot (सृजनस्रोत)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसृजनस्रोत\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रसिद्ध 'डिक्शनरी जॉन्सन', म्हणजे अठराव्या शतकातील इंग्लिश कोशकार डॉ. जॉन्सन यांचे चरित्रकार जेम्स बॉस्वेल हे नुकतेच कोर्सिका प्रांताचा दौरा करून आले होते. गप्पा मारताना ते जॉन्सनला म्हणाले, \"या दौऱ्याची हकीगत लिहायचा माझा इरादा आहे.\" तेव्हा डॉ. जॉन्सन उद्गारले, \"तुला जमतील तितक्या दंतकथा आम्हाला दे!\" (\"Give us as many anecdotes as you can.\") लेखक आणि लेखन यांविषयीच्या साहित्यिक दंतकथा (literary anecdotes) जगातल्या सर्वच भाषांमध्ये उपलब्ध असतात. परंतु त्या प्रयत्नपूर्वक शोधून, जमवून, नोंदवून ग्रंथगत करण्याची पद्धत मराठीत फारशी रुजलेली दिसत नाही. इंग्रजी भाषेचे मात्र तसे नाही. तिथला सर्व व्यवहार खुलाखुला असतो. त्यामुळे तिथल्या साहित्यिक विश्वातले असे किस्से, दंतकथा, यांचे संग्रह उपलब्ध आहेत. अनेक संबंधितांनी ते वेळोवेळी नोंदवूनही ठेवलेले दिसतात. त्यामुळे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वावर, साहित्यप्रकारावर वेगळा प्रकाश पडू शकतो; काही घटनांचे स्पष्टीकरण मिळू शकते; एखाद्या कलावस्तूच्या निर्मितीमागची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रेरणा समजू शकते. निखळ मनोरंजन तर होतेच. अशा काही रंजक आणि 'प्रेरक' हकिकतींचा कवितांच्या मागे दडलेला स्रोत शोधण्याचा हा एक प्रयत्न. मात्र हे लेखन किस्से-कहाण्यांच्या रंजक वरपांगी वाटेने न जाता रसग्रहण, विश्लेषण, समीक्षण, अर्थनिर्णयन या वाटा देखील शोधते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. शिरीष चिंधडे \u003cbr\u003eप्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003cbr\u003e   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52914274664770,"sku":"VARN0006","price":381.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SrujanstrotF.jpg?v=1775903565"},{"product_id":"uralela-aayushyat","title":"Uralela Aayushyat (उरलेल्या आयुष्यात)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eउरलेल्या आयुष्यात\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्याला भाजून काढणाऱ्या सूर्याच्या उन्हाचे चंद्राने सुखद चांदणे करून आपल्याला द्यावे तसे हेमंत गोविंद जोगळेकर आपल्या दुःखाची कविता करतात. त्यांच्या या 'तू' नुरल्यावर 'उरलेल्या आयुष्यात' चिरविरहाचा अंतःस्वर भरून राहिलेला आहे. कुठेही आक्रस्ताळी न होता, ही कविता दुःखाचा समंजस स्वीकार करते. सर्वांची होते. कधी 'तू' कडून 'ती' कडे जाते. 'ती' मध्ये शिरते. कधी ही 'ती' कविताच होते. कुठल्याही परिस्थितीत, हेमंत गोविंद जोगळेकरांच्या कवितेतील अंगभूत निरागसता लोपत नाही. अशी कविता मराठीत तरी अनन्यसाधारण आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. हेमंत गोविंद जोगळेकर \u003cbr\u003eप्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52914434179394,"sku":null,"price":201.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/UrlelyaAayushyatF.jpg?v=1775903968"},{"product_id":"ishwar-mala-gungunato-deep-ragasarkha","title":"Ishwar Mala Gungunato Deep Ragasarkha (ईश्वर मला गुणगुणतो दीप रागासारखा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eईश्वर मला गुणगुणतो दीप रागासारखा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसुमारे आठ वर्षांपूर्वी मला इंटरनेटवर बाबुषा कोहली ह्या हिंदी कवयित्रीचा शोध लागला. अमृता प्रीतमची मौलिकता, काव्यलेखनाविषयीचं गांभीर्य, जगभरातील साहित्य-कलाव्यवहाराबद्दलची जाण आणि कोणत्याही कळपापासून दूर राहून आपली स्वतंत्र वाट चोखळण्याचं धाडस, एवढे सारे गुण इतक्या लहान वयात तिच्या अंगात आहेत, ह्याचं मला वाटलेलं नवल अजूनही सरलं नाही. जी कविता आपल्याला आवडते, आपल्या भावविश्वाचा एक भाग आहे असे वाटते, तिच्याशी नातं जोडण्याचा एक मार्ग म्हणजे तिचा अनुवाद करणं असं मी नेहमीच मानलं आहे. त्याप्रमाणे गेली आठ वर्षे मी तिच्या कवितांचा अनुवाद करतो आहे. तिच्या कविता आपल्याला प्रचंड थकवतात. एक कविता पूर्ण वाचायची तरी दहादा थबकावं लागत. तिच्यात इतके सारे संदर्भ, इतकी सूक्ष्मता, इतके पदर असतात की कविता पुन्हा पुन्हा वाचावी लागते. दरम्यान तिची कविता आपल्या खूप पुढे निघून जाते. तिची त्यानंतर दोन की तीन पुस्तकं आली. त्यांना हात घालायचा धीर मला अजून झाला नाही. तिच्या आसपास जाऊ शकेल असा एकही लिहिता कवी मला मराठीत दिसत नाही. (हे माझे मत झाले.) तिच्या युवा ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या काव्यसंग्रहाचा हा अनुवाद आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. बाबुशा कोहली \u003cbr\u003eअनुवादित लेखक. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ \u003cbr\u003eप्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52914437292354,"sku":null,"price":273.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/IshwarMalaGunguntoDeepRagasarkhaF.jpg?v=1775905871"},{"product_id":"woohancha-wafara","title":"Woohancha Wafara (वुहानचा वाफारा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eवुहानचा वाफारा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविजय तांबे यांचा 'वुहानचा वाफारा' हा कथासंग्रह महत्त्वाचा आहे कारण वास्तववादी लिखाण प्रचंड प्रमाणात प्रसवले जात असलेल्या ह्या काळात कल्पिताच्या आधारे कथा आणि कादंबरी लिहिण्याचे जे तुरळक प्रयत्न अजूनही सुरू आहेत, त्याचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. स्वतःची म्हणून एक शैली विकसित झाली की बहुसंख्य लेखक त्या शैलीला शरण जातात. या पार्श्वभूमीवर एकाच संग्रहात मानसशास्त्रीय कथा, विज्ञानकथा आणि राजकीय डिस्टोपियन कथा या तीन वेगवेगळ्या कथाप्रकारांचा वापर ही एक सुखद गोष्ट आहे. या मागील कारण असे आहे की सामाजिक चळवळीमध्ये वाढल्यामुळे लेखकाचा पिंड हा प्रबोधनाचा आहे. आपल्या आसपास जे घडते आहे, त्याचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटणे लेखकाला महत्त्वाचे वाटते. 'वुहानचा वाफारा' या शीर्षककथेत लेखकाने कल्पिताचा आणि विज्ञानविषयक संशोधन व अभ्यासाचा उत्तम मेळ घातल्यामुळे ती एक वेगळ्याच ढंगाची विज्ञानकथा झाली आहे. कोराना काळाची पार्श्वभूमी वापरली असली तरी ही कथा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापराने बदलून गेलेल्या व अजूनही बदलत असलेल्या मूल्यव्यवस्थेविषयी काही मूलभूत चर्चा उपस्थित करते. एकाचवेळी भीतीही दाखवते आणि सोबतच आशेचा किरणही. विज्ञानविषयक तपशिलांनी निवेदन शैली व भाषा दुर्बोध न होऊ देणे ही गोष्ट लेखकाने साध्य केली आहे. सुलभीकरण आणि दुय्यम दर्जाचा वास्तववाद, वर्णनशरण निवेदनशैली आणि अवकाश भरण्यासाठी कथनात 'Packing Material' यांच्या वापराची मराठी कथनात्म साहित्याला सध्या जी खोड लागलेली दिसते, तिला हा कथासंग्रह छेद देतो व म्हणूनच तो आवर्जून वाचावा असा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विजय तांबे \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916187726146,"sku":"VARN0004","price":381.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/VuhanchaVafaraF.jpg?v=1775970415"},{"product_id":"aapula-thavo-n-sandita","title":"Aapula Thavo N Sandita (आपुला ठावो न सांडिता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआपुला ठावो न सांडिता\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसुरेंद्र दरेकरांच्या कथा पुनर्वाचनात अधिक आनंद देतात, पण ती काही या कथा वाचायची पूर्वअट नव्हे. दोन स्तरांवर दरेकरांची कथा वाचकाला समृद्ध करते असा याचा अर्थ. पृष्ठभागावर अतिशय संयत आणि प्रगल्भ हाताळणीने ते मानवी नात्यांचे अन्वयार्थ शोधत अनाग्रही शैलीत वाचकाला अंतर्मुख करतात तर पुनर्वाचनात कथेचे खोल तत्त्वज्ञानात्मक अंतःस्तर उलगडतात आणि मौलिक, तात्त्विक आशयाने वाचक स्तिमित होतो. 'आपुला ठावो न सांडिता'चे सुप्तकेंद्र असलेली मिशेल तसेच 'अवचिता परिमळू'मधली मंजू काय किंवा 'विकल्पाचिया वाटा'मधली शुभा काय, या नायिका जगणे मौलिक करण्याच्या प्रवासात 'जग आणि जगणे' याची आपलीही जाण उन्नत करतात. तेच तर अभिजात साहित्याचे प्रयोजन. मराठी साहित्यातली संयत आणि प्रगल्भ कथेची वाट दरेकर आपल्या मौलिक कथेने सशक्त करून पुढे नेत आहेत. त्यामुळे उन्नत अभिरुचीच्या वाचकांना या कथा अतिशय समृद्ध अनुभव देतात. तपशील समृद्ध असलेल्या या कथा आक्रमक किंवा आक्रस्ताळा सूर न पकडता अनाग्रही शैलीत वाचकाशी प्रातिभ भागीदारी करतात. आवर्जून वाचायला हव्या अशा या कथा आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुरेंद्र दरेकर \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916210958658,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AapulaThavoNSanditaF.jpg?v=1775970988"},{"product_id":"jhural-aani-itar-kahibahi","title":"Jhural Aani Itar Kahibahi (झुरळ आणि इतर काहीबाही)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eझुरळ आणि इतर काहीबाही\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'झुरळ आणि इतर काहीबाही' हा प्रमोदकुमार अणेराव यांचा कथासंग्रह त्याच्या शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेणारा आहे. या कथासंग्रहातील कथांची जातकुळी, तिचा बाज, तिची शैली, प्रतीकात्मकता वेगळ्या वाटेने जाणारी आहे. चाकोरी ओलांडून गेलेल्या आडव्यातिडव्या अनुभवांना भिडण्याचं धाडस त्यांची कथा करते. सामान्य माणूस ते कलावंत, त्याची कला, त्या कलेमागची तत्त्वं, भूमिका असे वेगवेगळ्या स्तरांवरील मानवी व्यवहारांचे, जगण्याचे आलेख त्यांची कथा चितारते. या कथांमधून व्यक्त होणारे माणसांचे प्रश्न वरवर पाहता साधे वाटतात, पण त्या प्रश्नांच्या मुळाशी असणाऱ्या त्यांच्या जगण्याच्या अडचणी, वेदना, व्यथा आपल्याला हलवून सोडतात, अंतर्मुख करतात. अस्वस्थता देणाऱ्या त्यांच्या एकेक कथेतून लेखक म्हणून प्रमोदकुमार अणेराव यांची संवेदनशक्ती किती तीव्र स्वरूपाची आहे, हेही त्यातून जाणवत राहते. त्यांच्या या संवेदनशीलतेला अस्तर आहे ते त्यांच्यातील चित्रकाराच्या, कवीच्या अस्सल प्रतिभेचे. कधीकधी त्यांची कथा म्हणूनच एक सजीव, बोलके 'चित्र' होऊन जाते, तर कधी काव्यात्मकतेचा प्रत्यय देणारी 'गद्य कविता'! या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या कथेला आपोआपच वेगळे परिमाण लाभते आणि स्वतंत्र अशी ओळखही प्राप्त होते. मराठी कथाविश्वाची परंपरा समृद्ध आहे. नवीन पिढीकडून वेगवेगळ्या प्रयोगशील कथा लिहिल्या जात आहेत, त्यात प्रमोदकुमार अणेराव यांची कथा उठून दिसेलच, परंतु तिच्या स्वतंत्र 'चेहऱ्यामुळे' तिला महत्त्वाचं स्थानही मिळेल असा विश्वास वाटतो!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रमोदकुमार आणेराव \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916221149506,"sku":"VARN0005","price":291.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JhuralAaniItarKahivahiF.jpg?v=1775971558"},{"product_id":"cape-cod","title":"Cape Cod (केप कॉड)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e केप कॉड\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहेन्री डेव्हिड थोरो (१८१७-१८६२) हे एकोणिसाव्या शतकातील महान तत्त्वज्ञ, निसर्गवादी निबंधकार, कवी आणि पर्यावरणवादाचे जनक होते. त्यांच्या 'केपकॉड' या प्रवासवर्णनाचा भगवंत क्षीरसागरांनी केलेला हा अनुवाद आहे. हेन्री डेव्हिड थोरो यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि आचरणाचा म. गांधी यांच्या विचारांवर आणि जीवनावर फार मोठा प्रभाव होता. गांधीविचार समजून घेण्याच्या दृष्टीने थोरो यांचे वाङ्मय मराठीत येणे गरजेचे आहे. त्यामुळेही 'केपकॉड'चा हा अनुवाद महत्त्वाचा मानावा लागतो. थोरोंनी आपल्या वाङ्मयातून आणि चिंतनपर लेखनातून निसर्गाचे एक वेगळेच दर्शन घडवले आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील संवादी आणि संघर्षपूर्ण नात्याचा वेध त्यांनी घेतला आहे. निसर्ग जसा स्वाभाविकपणे मानवाचे भरणपोषण करतो तसेच तो तितक्याच स्वाभाविकपणे मानवाचा विनाशही घडवतो. मानवही जसा निसर्गापुढे नतमस्तक होतो तसाच तो निसर्गावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्नही करतो. मानवी जीवन म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातील संवादी आणि संघर्षपूर्ण नात्याची कहाणी. या नात्याचीच एक नाट्यपूर्ण कहाणी थोरोंनी प्रस्तुत पुस्तकात कथन केली आहे. निसर्गासंबंधीचे हे थोरोंचे तत्त्वज्ञान मराठी वाङ्मयाला अनोखे आहे. त्यामुळे केपकॉड मराठीत अनुवादित होणे आवश्यक होते. हा अनुवाद करून भगवंत क्षीरसागरांनी ही उणीव भरून काढली आहे. अमेरिकन वाङ्मयात अजोड स्थान असणाऱ्या प्रवासवर्णनाचा अतिशय प्रत्ययकारी अनुवाद भगवंत क्षीरसागरांनी सादर केला आहे. तो नक्कीच मराठी साहित्यात मोलाची भर घालील याचा मला विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. हेन्री डेव्हिड थोरो\u003cbr\u003eअनुवादित लेखक. भगवंत क्षीरसागर \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916254212418,"sku":null,"price":327.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KepcodF.jpg?v=1775973267"},{"product_id":"yannis-ritsos-yanchya-kahi-kavita","title":"Yannis Ritsos Yanchya Kahi Kavita (यानिस रित्सोस यांच्या काही कविता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eयानिस रित्सोस यांच्या काही कविता\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eका वाचायच्या यानिस रित्सोसच्या कविता? का म्हणून वाचायचे यानिस रित्सोस या ग्रीक कवीच्या कवितांचे मराठी रूपांतर? ते विसाव्या शतकातील प्रतिरोधाची, निषेधाची कविता लिहिणारे महत्त्वाचे कवी होते म्हणून ? ते कवी असूनही आजन्म कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सदस्य होते आणि त्यांनी आयुष्यभर सत्तेच्या विरोधातल्या संघर्षात सक्रिय सहभाग घेतला म्हणून? त्यांनी त्यांच्या बहुतेक कविता या तुरुंगवासात असताना, दमनकारी सत्तेने देशाबाहेर हद्दपार केलेले असताना लिहिल्या म्हणून ? की त्यांच्या कविता वाचायच्या कारण त्या सर्वार्थाने सच्च्या कविता आहेत म्हणून? रित्सोस यांच्या त्या कवितांतला प्रतिरोध, निषेध हा त्या कवीच्या आणि कवितेच्याही व्यक्तित्वाचा भाग आहे. या कवितेचा आत्मा हा मूलतः एका कवीच्या हृदयातील करुणा आहे. हा कवितेचा आत्मा रूपबंधाचा देह धारण करत असताना आपल्या अंगभूत प्रतिभेमुळे प्रतिमा, प्रतीकं, उपमा आदी काव्यालंकारांचा वापर करत, कवितेची आंतरिक लय किंचितही बिघडू न देता, उपलब्ध भाषेचा वापर करते. ती पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात ऐकली\/वाचली गेल्यास रसिकाच्या हृदयापर्यंत थेट पोचण्याची क्षमता असलेली कविता आहे म्हणून या कवीचा आणि त्याच्या कवितेचा मराठी रसिकाशी परिचय व्हायला हवा. तुरुंगवासात, देशाबाहेर हद्दपार केलेले असताना अत्यंत हालअपेष्टांत दिवस काढत असतानाही हा कवी लिहित होता, एका अविचल निष्ठेने लिहित होता. त्याची जवळजवळ शंभर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कदाचित त्याची त्याच्या विचारधारेइतकीच शब्दांवर, लिहिण्यावर श्रद्धा होती. त्याने तुरुंगवासात लिहिलेल्या कविता वाचत असताना सहृदय रसिकाला अनेकदा आपले डोळे ओले झाले आहेत, हे कळतसुद्धा नाही. ही यानिस रित्सोस यांच्या कवितांची ताकद आहे. म्हणून या कविता वाचायला पाहिजेत. त्यांची मराठी रसिकांना ओळख व्हायला पाहिजे. या कविता मुळात ग्रीक भाषेत लिहिल्या गेलेल्या कविता आहेत ज्या पुढे इंग्रजीत, भाषांतरित झाल्या व पुढे हिंदीत आणि आता मराठीत रूपांतरित होऊन रसिकांपर्यंत पोचताहेत. या प्रक्रियेत मूळ कवितेतील आशयाचा, काव्यगुणांचा किती ऱ्हास झाला असेल, हे सांगणे कठीण आहे पण हे रूपांतर करणारे मनोज सुरेंद्र पाठक हे इतर भाषेतील कवींच्या कवितांचे रूपांतर करताना संहितेत स्वतःच्या हृदयीचे काहीतरी 'ओले' नेहमीच मिसळत असतात. त्यामुळे त्यांच्या रूपांतरांत नेहमीच एक करुणेचा, माणुसकीचा, भावनेचा आत्मीय ओलावा असतो. तो रसिकांना यातूनही निश्चितच जाणवेल\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. यानिस रित्सोस\u003cbr\u003eअनुवादित लेखक. मनोज सुरेंद्र पाठक \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003cbr\u003e  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916272038210,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/YanisRitsosYanchyaKahiKavitaF.jpg?v=1775974513"},{"product_id":"samjutdar-janivanche-kavdse","title":"Samjutdar Janivanche Kavdse (समजूतदार जाणिवांचे कवडसे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमजूतदार जाणिवांचे कवडसे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबाळकृष्ण सोनवणे यांची कविता जगण्याला विन्मुख न होणारी, सश्रद्ध मनाचा लोभस अविष्कार करणारी आणि स्वतःचा थेट आतून बाहेरून शोध घेणारी आहे. विखुरलेपण, संवाद, अलिप्तता, हरवलेल्या संवेदना, मूल्यञ्हास या सर्वांमुळे स्वतःवरचाच भरवसा उडत जावा अशा वातावरणाचा वेध ही कविता समर्थपणे घेते. वर्तमान जगण्यातले अनेक प्रश्न या कवितेतून उभे राहतात. जातिवाद, पोकळ समाजवाद, विषमता यामुळे पराभूत होत परस्परांपासून दूर झालेली माणसे व त्यांचे मुल्यहीन जगणे कवीच्या काळजावर चरे पडतात. मानवी जगण्यातलं सौहार्दाचं आकाश फाटल्याचं दुःख, ताटातुटीमुळे पराभवाची गाणी गाणाऱ्या वस्त्या, दहशतवादाचं पसरत जाणारं साम्राज्य, क्रौर्य-कामुकता-गलिच्छपणा यांचा उग्र गंध सोसत वाट तुडवणाऱ्या बायाबापड्या नि निरागस मुली, कायद्याचे तोकडेपण, समोर दिसणारी विनाशाची वाट यातून मार्ग सापडत नसल्याचा उच्चार ही कविता करते. परिणामी स्तब्धता, हताशता आणि ओठ दाबून आत्ममग्न होण्याची सामान्य माणसाची अगतिकता या कवितेच्या केंद्रस्थानी येऊ पाहते. जीव गुदमरून जावा अशा टोकदार अनुभवांचे कंगोरे आणि उद्ध्वस्त होत जाणारी माणसे यातून जगण्याची दिशाहीन वास्तवता बाळकृष्ण सोनवणे अधोरेखित करतात. या कटू सत्याला स्वीकारत्त शेतीमातीशी जोडलेलं नातं, आईची माया, आजीच्या आठवणी, प्रिये साठीची श्रृंगाराची साद यांचे पाझर त्यांच्या कवितेतून पाझरत राहतात. सर्वव्यापी चैतन्याच्या आणि जीवनसत्याच्या शोधासाठी ही कविता तदाकार होऊन शब्दब्रह्माला गवसणी घालू पाहते. एकूणच भोवतालच्या अनार्त कोलाहलात करुणाकर साकारण्याची आस बाळगणारी ही कविता तीव्र संवेदनशीलता प्रभावीपणे अभिव्यक्त करीत राहते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. बाळकृष्ण सोनावणे \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916278624578,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SamjutdarJanivancheKavadseF.jpg?v=1775975664"},{"product_id":"palyadee-bhasha-alyadee-jeevane","title":"Palyadee Bhasha Alyadee Jeevane (पल्याडी भाषा आल्याडी जीवने)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपल्याडी भाषा आल्याडी जीवने\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकुठलीही निर्मिती हा आत्मशोधच असतो. म्हणूनच सर्व भारतीय वैशिष्ट्यांचे चित्रण करण्यासाठी, भावनांना अभिव्यक्ती देण्यासाठी विविध भारतीय भाषांमधून वाङ्मयनिर्मिती झाली. कारण भाषा हे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. इंग्रजीचा आपल्या लेखकांवर जास्त प्रभाव असल्याने त्या त्या काळातील नवीन पिढीचा कल इंग्रजीकडे जास्त दिसतो. शिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीयांचेदेखील लिखाण इंग्रजीत झाल्याने तेही भारतीय इंग्रजी साहित्य समजले जाते. रूथ प्रवर झाबवाला, निस्सीम इझिकेल, मुल्कराज आनंद, व्ही. एस. नायपॉल ही काही उदाहरणं. नवीन दमाचे लेखक विक्रम सेठ, अरुंधती रॉय यांना विसरून चालणार नाही. नोबेलविजेत्या टागोरांपासून मुल्कराज आनंद, राजा राव, आर. के. नारायण, अनिता देसाई, शशी देशपांडे यांच्या कादंबऱ्या, निस्सीम इझिकेल, कमला दास, जयंत महापात्रा, पार्थसारथी, अरुण कोलटकर यांच्या कवितांना कोणतेही निकष लावले तरी ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, हे नाकारता येणार नाही. नायपॉलना नोबेल पुरस्कार आणि विक्रम सेठ, अरुंधती रॉय, किरण देसाई यांना बुकर पुरस्कार मिळाले आहेत. या सर्वांच्या लेखनात भारतीय अस्मिता, संवेदनशीलता प्रतीत होते. भौगोलिकदृष्ट्या लेखकांचे वर्गीकरण केले तरी मूळ प्रेरणा जीवनमूल्ये सर्वत्र तीच असतात. म्हणून भारतीय इंग्रजी लेखकांचे स्थान साहित्यविश्वात खासच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. पुरुषोत्तम देशमुख \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003cbr\u003e  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916280426818,"sku":"VARN0002","price":247.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PalyadiAlyadiJivaneF.jpg?v=1775976083"},{"product_id":"aadibandhatmak-samiksha","title":"Aadibandhatmak Samiksha (आदिबंधात्मक समीक्षा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआदिबंधात्मक समीक्षा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'समीक्षा' या साहित्यप्रकाराविषयीची उदासीनता ही जगभरातील सर्वच भाषांतील पर्यावरणात गेल्या काही दशकांत जाणवू लागली आहे. मराठी भाषा त्याला अपवाद नाही. या उदासीनतेमुळे समीक्षाविषयक अनेक पुस्तके 'Out of Print' झालेली आहेत. स्मृतिशेष ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे 'आदिबंधात्मक समीक्षा' हे त्यापैकीच एक पुस्तक. जागतिक समीक्षा व्यवहारात मानसशास्त्रीय अभ्यासाच्या मदतीने केली जाणारी आदिबंधात्मक समीक्षा ही एक महत्त्वाची समीक्षा पद्धती मानली जाते. जगात विविध भाषांतून आदिबंधात्मक समीक्षेविषयी भरपूर लिखाण केले गेले आणि अजूनही केले जात आहे. मराठी भाषेत मात्र गंगाधर पाटील यांनी या समीक्षा पद्धतीची मराठी वाचकांना व अभ्यासकांना ओळख करून दिल्यानंतर डॉ. म. सु. पाटील यांचा अपवाद वगळता या समीक्षा पद्धतीबद्दल फारसे सैद्धांतिक किंवा उपयोजित या स्वरूपाचे लेखन झालेले दिसत नाही. अलीकडे अमळनेरचे भरतसिंग पाटील यांनी आदिबंधात्मक समीक्षेचे उपयोजन करून दोन पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांनाही अपवादात्मकच मानले पाहिजे. डॉ. म. सु. पाटील यांचे हे अत्यंत मोलाचे पुस्तक अभ्यासासाठी सुद्धा उपलब्ध असू नये, ही काही भूषणावह बाब नाही. म्हणून वर्णमुद्रा प्रकाशनाद्वारे हे पुस्तक वाचकांना व अभ्यासकांना पुनर्मुद्रित करून उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी मनोज मित्र असला तरी त्याचेही आभारच मानले पाहिजेत. मुनव्वर राणा यांचे दोन शेर आठवतात\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. म. सु. पाटील \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916286423362,"sku":"VARN0003","price":363.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AadibandhatmakSamikshaF.jpg?v=1775976732"},{"product_id":"orwelliya","title":"Orwelliya (ऑर्वेलिया)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eऑर्वेलिया\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजॉर्ज ऑर्वेल यांनी नाइन्टीन एटीफोर ही कादंबरी १९४८ साली लिहिली. ती १९४९ साली पुस्तकरूपात प्रकाशित झाली. तेव्हा ती समकालीन होती, आणि आज २०२० सालीही ती समकालीनच आहे. १९४९ मध्ये या कादंबरीत भविष्यकालीन स्थिती वर्णिली आहे, ३६ वर्षांनंतर जग कोणत्या स्थितीत असेल याची कल्पना केली आहे असे काही तत्कालीन वाचकांना वाटले असेल, काहींना ३६ वर्षांनंतरच्या जगाची नव्हे तर आजच्याच जगाची स्थिती या कादंबरीत दाखवली आहे असेही वाटले असेल. १९८४ नंतरच्या ३६ वर्षांमध्ये ही कादंबरी १९८४ च्या आसपासची केवळ नव्हे तर कालच्या आजच्या १९८५ पासून २०२० पर्यंतची आहे असे पुष्कळ वाचकांना वाटल्याचे दिसलेले आहे. गेली सत्तर वर्षे ही कादंबरी लोकांच्या नुस्त्या स्मरणात नव्हे तर वाचनात आहे. कारण कोणत्याही काळातल्या वाचकाला ती आपल्याच आजच्या काळाचा आलेख दाखवणारी आहे असे वाटलेले आहे. हिटलरशाही, स्टॅलिनशाही, धार्मिक हुकूमशाही या वस्तुस्थिती आहेत आणि त्यांचीच रूपान्तरे जगात अनेक ठिकाणी अनुभवास येत गेलेली आहेत. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रांतही कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे याची जाणीव दिवसेंदिवस तीव्रतेने होऊ लागलेली आहे. नाइन्टीन एटीफोरमधले बिग ब्रदर इज वॉचिंग यू हे वाक्य आज कोणत्या ना कोणत्या रूपात आणि सर्वत्रच प्रत्ययास येत राहते. इतरही काही गोष्टी आज आपल्या वास्तवाच्या भाग झालेल्या आहेत, त्यांचा उच्चार या कादंबरीत झालेला आहे. दमनकारी सत्ता दोन अधिक दोन बरोबर पाच म्हणायला लावत असते. बहुसंख्य जनता, त्यात बुद्धिजीवी, विचारवंत, मध्यमवर्गीयही आले, ते मान्य करते. परंतु अशाही काही व्यक्ती असतात, ज्यांना दोन अधिक दोन बरोबर चार हेच म्हणायचे असते, नाइन्टीन एटीफोरमध्ये दोन अधिक दोन बरोबर पाच म्हणणारी सर्वकष सत्ता आणि दोन अधिक दोन बरोबर चार म्हणू पाहणारी सामान्य व्यक्ती यांच्यातला विकराळ संघर्ष आहे. या संघर्षात ही व्यक्ती पराभूत होणार हे वाचकाला आधीपासूनच माहीत असते, तसे त्याने गृहीत धरलेले असते. अर्थातच त्या व्यक्तीचा पराभव म्हणजे डोके ताळ्यावर ठेवू पाहणाऱ्या सर्वच व्यक्तींचा पराभव हेही माहीत असते. एका अर्थाने वाचक स्वतःच्याच शोकात्म पर्यवसानाची कहाणी वाचत असतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक. मनोज सुरेंद्र पाठक \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916305985858,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/OrveliyaF.jpg?v=1775978012"},{"product_id":"saxophone-he-varatit-vajavayche-vadya-navhe","title":"Saxophone He varatit Vajavayche Vadya Navhe  (सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे याचे भान नसलेल्या काळात आपण क्वचित कधीतरी जातो 'जॅझ बाय द बे'मध्ये जिथे काळाशार, कातळासारखा रेखीव देहाचा माणूस सॅक्सोफोनमध्ये आपले प्राण फुंकत असतो आपल्या गुलाम पूर्वजांच्या दुःखाचे गाणे गात असतो आपल्याच देहात आपण गाडले जात असतो- अपराधबोधाने आपल्या पूर्वजांच्या पापांच्या आठवणींनी आपण रेस्तराँच्या बाहेर येतो तेव्हा समुद्रही अस्वस्थ झालेला असतो त्यालाही आठवत असतात ते गुलाम त्यांचे ते निथळत्या घामाने उजळून निघालेले काळेशार, कातळासारखे रेखीव देह आपल्या प्राणांना पिळवटून टाकते समुद्राची गाज आणि काळीज कोरत जातात सॅक्सोफोनचे कातर स्वर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक. गणेश वामन कनाटे \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916322009410,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Saxophone_Varatit_Vajvayche_Vadya_Nhave_F.jpg?v=1775978766"},{"product_id":"trushnakarsha","title":"Trushnakarsha  तृष्णाकर्ष)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e तृष्णाकर्ष\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवर्णमुद्राच्या गरुडदृष्टीस म्हणा की सीसीटीव्ही कॅमेरामध्ये म्हणा हा कवी कैद झाला, ती विलक्षण योगायोगाची गोष्ट ठरली. ब्लॉगवर कविता लिहिणारा तेजस तत्कालीन संपादक व ब्लॉग वाचक दिनकर मनवरांच्या नजरेने हेरला त्या वेळी मी नागपूरला होतो. कविता वाचून 'संग्रहाइतपत (ही संख्या किती असावी? ते अद्याप कुणी ठरविलेले नाही तरीही) कविता आहेत की कसे? संग्रहोत्सुक आहात किंवा कसे ? आम्ही (वर्णमुद्रा) स्वीकारार्ह आहोत का?' या व तत्सम प्रश्नांकरिता कवीला फोन लावला व कळवले की, मी असा असा प्रकाशक, शेगाव जिल्हा बुलडाणा. पलीकडून कवी म्हणाला- मी शेगावलाच आहे कालपासून, परवा पुण्याला परत जाईन. मी एक क्षणभर थबकलो व नागपूरहून शेगावला आलो. यापुढील गोष्टी 'खासगी' सदरात मोडतात. तेजसची कविता काय नि कशी हे काळ नावाचा समीक्षक ठरवेलच, बाजूला प्रभाकर कोलतेंसारख्या दिग्गजाचे ओथंबून लिहिलेले शब्दच पुरेसे व बोलके आहेत. व्यक्तिशः मला (माझ्या मुलांसह) कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली ही मुलं मराठीचं काय करणार, अशी काळजी असते. - त्याच कॉन्व्हेंट पिढीतील एक असलेल्या तेजसने तूर्त तरी माझी ती काळजी निराधार ठरवली आहे. हे आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाचे आहे. ह्या अंकुराचा विशाल वृक्ष होत जाताना पाहणे वर्णमुद्रासाठी अपार आनंदाचे ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक. तेजस मोडक \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916334264642,"sku":null,"price":264.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TrushnakarshF.jpg?v=1775979227"},{"product_id":"dirgha","title":"Dirgha (दीर्घ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदीर्घ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात गणेश कनाटे यांचे तीन महत्त्वाचे निबंध एकत्रित केलेले आहेत. भालचंद्र नेमाडे यांचा देशीवादाचा सिद्धान्त, दीर्घकविता या काव्यप्रकाराचा रूपबंध, आणि मराठी समीक्षेच्या संदर्भात विश्वभानाचा विचार अशा महत्त्वाच्या विषयांवर हे निबंध लिहिलेले आहेत. या निबंधांचे लेखन विद्यापीठीय शिस्तीने केलेले, चिकित्सक, विचार-विमर्श पद्धतीने केलेले असल्यामुळे ते महत्त्वाचे ठरलेले आहे. 'दीर्घकविता : स्वरूप आणि गुणलक्षणे' या निबंधात कनाटे यांनी महाकाव्य, खंडकाव्य, एपिक या काव्यप्रकारांच्या रूपबंधांची लक्षणे स्पष्ट करून दीर्घकविता या प्रकाराचा रूपबंध यांहून वेगळा कसा आहे हे स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे भावकवितेच्या रूपबंधाहून दीर्घकवितेच्या रूपबंधाचे निराळेपण नेमके कशात आहे याचे विवेचन त्यांनी केले आहे. दीर्घकविता म्हणजे दीर्घ भावकविता, दीर्घ चिंतनगर्भ कविता, दीर्घ कथाकविता, दीर्घ नाट्यकविता नव्हे, किंवा दीर्घ गीत नव्हे. हे सर्व घटक दीर्घकवितेत असू शकतात, तरीही तिचा रूपबंध वेगळा असतो असे कनाटे यांचे प्रतिपादन आहे. चिंतनशीलता, कथनात्त्ममकता, अनेक संदर्भयुक्तता, बहुआवाजी भाषा, अर्थांची बहुलता असलेली रचना म्हणजे दीर्घकविता असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. दीर्घकवितेच्या रूपबंधाबाबत अपवादात्मक लेखन झालेले असताना कनाटे यांचे काम मोलाचे आहे. 'मराठी समीक्षेला जागतिक भान असणे म्हणजे नेमके काय' या निबंधात कनाटे यांनी मराठीतील समीक्षाव्यवहाराचा धांडोळा घेऊन त्यांतील दोष, अभाव स्पष्टपणे सांगितले आहेत. मराठीतील समीक्षकांचे जागतिक भान हे किती क्षीण, वरवरचे आणि तोकडे आहे याची जाणीव ते करून देतात. त्याचप्रमाणे भारतीयांच्या साहित्यविज्ञानाबाबतही आपण किती उदासीन आहोत याविषयीची खंतही ते व्यक्त करतात. म्हणजे धड पाश्चिमात्य साहित्यसिद्धान्तांचा अभ्यास नाही, आणि भारतीय साहित्यसिद्धान्तांचेही ज्ञान नाही अशा आमच्या समीक्षकांविषयी त्यांना होणारा खेद प्रांजळपणे ते व्यक्त करतात. मराठीतील तत्त्वज्ञ समीक्षकाची अनुपस्थिती त्यांना खटकते, फ्रैंकफुर्ट स्कूलसारखे काम आपल्याकडे होईल का याविषयी शंका वाटते. मराठी समीक्षेत काही काम करायचे इच्छा असलेल्यांनी हा निबंध वाचलाच पाहिजे. 'नेमाडेप्रणीत देशीवादाची कालबाह्यता' या निबंधात कनाटे यांनी बहुचर्चित देशीवादाविषयीचे आक्षेप परखडपणे व्यक्त केले आहेत. असे करताना 'देशीवाद' केंद्रस्थानी ठेवलेला असल्यामुळे अकादमिक असे रूप या निबंधाला लाभले आहे. खूप संदर्भानी युक्त अशा या निबंधात कनाटे यांनी देशीवादाची जी चिकित्सा केली आहे, ती अनन्य आहे. - वसंत आबाजी डहाके\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक. गणेश वामन कनाटे \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916343669058,"sku":null,"price":399.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DirghF.jpg?v=1775979620"},{"product_id":"avkash-aasa","title":"Avkash Aasa (अवकाश आसा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअवकाश आसा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसाठोत्तरीच्या फळीतील एक महत्त्वाचे कवी सुरेश कदम अनपेक्षितपणे पडद्याआडच कसे राहिले याचे आश्चर्य वाटते. कदाचित आपल्या तत्कालीन वाङ्मयीन अनास्थेमुळेसुद्धा हे घडले असावे. असो, कशाही बद्दल तक्रारीचा राग न आळवता ध्यानीमनी नसताना अवचित हाती लागलेला हा विलक्षण जोमदार ऐवज सुपूर्द करताना वर्णमुद्राला आनंद होतो आहे. मन्या ओक, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर आदी मित्रांसोबत राहून समकालीन वाङ्मयीन संस्कार पचवलेल्या व आपली वाट 'द रोड नॉट टेकन'च्या न्यायाने चाललेल्या एका अनवट कवीची ही संयत कविता. सांप्रत काळातील कोलाहलाला अंगभूत जोम, जोरकसपणाने आदरयुक्त कृतज्ञभाव निर्माण करणारी ठरेल व 'प्रासकाळात' घेऊन जाईल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुरेश कदम \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916386758978,"sku":null,"price":283.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AvkashAasaF.jpg?v=1775982095"},{"product_id":"hrud","title":"Hrud (हृद)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eहृद\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुळसी परब साठोत्तरी पिढीतील अत्यंत महत्त्वाचे कवी आहेत. अनुभवाची दाहकता, प्रचिती आणि दुःखाची स्थाननिश्चिती त्यांची कविता करून देते. त्यांचे 'हिल्लोळ', 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' आणि 'कुबडा नार्सीसस' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी पाब्लो नेरुदांच्या कवितांचे अनुवादही केले आहेत. एका पिढीच्या अस्वस्थ जाणिवांचा समग्रपणे विचार करणारी ही कविता आहे. त्यांच्या कवितेतून ओसंडणारं दुःख तत्कालीन संदर्भअसलेलं अथवा अत्यंत खासगी असलेलं नाही. त्याचा परीघ शेवटच्या माणसापर्यंत विस्तारलेला असतो. त्यातील सामाजिकता थेट समष्टीकडे निर्देश करते. कवितेतून मानवी अस्तित्वाबरोबर भोवतीची गूढ वलयं शोधण्याची उत्कंठा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. दुःखाच्या कार्यकारणभावाचा शोध त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्यातील स्वारस्य प्रतिमांच्या विविधतेतून उलगडण्याचा सोस त्यांना आहे. कोणत्याही शीर्षकाच्या बंदिशीतील आशय त्यांची कविता मांडत नाही तर त्यांच्या अनुभवाचा अवकाश सभोवतालातील समग्रता कवेत घेण्यासाठी उत्सुक असतो. कविता म्हणजे समष्टीसोबत स्वतःचं असणं अशी निरंतर जाणीव ठेवणं होय. अशी मांडणी करतांना आत्मप्रचितीच्या ठोस परिमाणातून त्यांची कविता पुढे येते. 'हृद' हा त्यांच्या आतापर्यंतच्या समग्र जीवनजाणीवेचा प्रवास आहे. ह्या आत्मप्रचितीच्या ठायी अनुभवसिद्ध बुद्धिग्राह्यता जागृत असून, तिच्या विचारप्रवणतेतून मानवी अस्तित्वाचा, गूढत्वाचा अंतिम वेध घेतांना ती दिसून येते. ह्या कवितेला झालेला 'सुफी स्पर्श' अत्यंत महत्त्वाचा वाटतो\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक.तुळसी परब \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916391772482,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/HrudF.jpg?v=1775982522"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/varnamudra-publishers.oembed?page=2","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}