Author : Chandrakant Khot | Publisher : Dimple Publication |
Translator : - | Category : कादंबरी संकिर्ण |
ISBN No. : 9789392419010 |

दोन डोळे शेजारी कथाप्रवाहात प्रमुख निवेदिका आहेत शारदामाताजी. त्या प्रत्यक्ष लेखकालाच एकामागून एक घटना सांगताहेत, असा हा आकृतिबंध आहे. या घटना सांगताना मात्र माताजी कालक्रमानुसार सलग एका वर्षामागून दुसरं वर्ष असा क्रम मुळीच ठेवत नाहीत. त्यांच्या निवेदनात कोणतीही घटना कोणत्याही क्रमानं येते. आता एकदा असा निर्बंध म्हणण्यापेक्षा विमुक्त आकृतिबंध स्वीकारल्यानंतर खरे तर लेखकाची तारेवरची कसरत व्हायला हवी. तसे मात्र होत नाही. अत्यंत सफाईनं हा कथाविषय क्रमशः फुलत जातो. अशा लिखाणाच एक वैशिष्ट्य असतं. सलग वाचलं तरी आनंदात बिघाड येत नाही. अबकडइ च्या दीर्घ संपादनाचा अनुभव दोन डोळे शेजारी च्या बांधणीत लेखकाला इथे फार उपयोगी पडलेला दिसतोय.