Author : Uttam Kamble | Publisher : |
Translator : - | Category : ललित |
ISBN No. : 29964 |

व्यवस्थेच्या कुठल्या तरी कोपर्यावर बिनचेहर्यांची होऊन ती जगत असतात दोन श्वासांमधली घालमेल ती कशी पचवतात यावर त्यांच जगण आणि मरणही असत अवलंबून अनेक वर्ष मी ही घालमेल बघत आलोय शक्य झाल्यास ओंजळभर घालमेल घेतही आलोय जगताना जशी त्यांची घालमेल्ल होते तशीच ती लिहिताना माझीही होतेय लिहूनही ती थांबली नाही तर पुस्तकरूपान ती बाहेर पडते अखंड घालमेल अस नाव धारण करून