Gad kot durga Ani Tyanchi Vastu ( गड कोट दुर्ग आणि त्यांची वास्तु )
Author : V S Bendre | Publisher : Marathidesha Foundation |
Translator : - | Category : शिवाजी महाराज साहित्य |
ISBN No. : 9788195478941 |

गड कोटांच्या बांधकामात हलगर्जीपणा किंवा चालढकल झालेली दृष्टीस पडत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या सर्वच कामगार लोकांची त्या वास्तूकडे पाहण्याची संरक्षणाच्या जबाबदारीची आणि आपुलकीची दृढ भावना हे होय. इतिहासकालीन गड किल्ल्यांच्या वास्तुशास्त्रात महाराष्ट्रात झालेली प्रगती कोणालाही अभिमान वाटण्यासारखी होती यात शंका नाही. सांप्रत ते वास्तुशास्त्र जरी कालाने निरूपयोगी केले असले तरी त्यात मानवास मिळालेला अनुभव व उद्योगतत्परता भविष्यकालातही आदर्शनीय वाटत राहिली तर नवल नाही.