• -10%

Ghat Rikama (घट रिकामा )

SKU
UTK0202
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Author : B P kalave Publisher : Utkarsha Prakashan
Translator : - Category : Author
ISBN No. : 9789391663018

-
+
payment-image
Overview

घट रिकामा ही लेखकांची नवी कादंबरी ग्रामीण पार्श्वभूमी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाबद्दल, घटस्फोट या वेदनादायी दुर्घटनेबद्दल चिंतनशीलतेने निवेदन करते. दु:खपर्वाला संयमाने सामोरी जाते.विवाह हा जुगार आणि घटस्फोट हा अग्निकुंड अस कादंबरीकार म्हणतो आहे आणि ते खरंदेखील आहे. पण घटस्फोटाची खरी कारण सहसा प्रकट होत नसतात. घटस्फोटामुळे सामाजिक व्यवस्था विस्कटते, पण व्यक्तींची आंतरिक व्यवस्थासुध्दा उदध्वस्त होत असते. 

दु:खद वैवाहिक जीवन विसरण्यासाठी व्यापक आशावाद गरजेचा आहे. आणि त्याचबरोबर माणसाने 'पूर्वग्रहदोषमुक्त दृष्टीकोन' सुद्धा बाळगला पाहिजे, असं काहीस बर्ट्रांड रसेल म्हणतो. या त्यांच्या म्हणण्याचा  लेखक श्री. भ. पु कालवे यांनी कादंबरीच्या सुरुवातीलाच आधार घेतला आहे. व्यापक आशावाद कोठून येतो आणि कसा मिळविता येतो,याबाबत आपल्या परंपरेत काहीएक चर्चा झाली आहे.

उदा. भवसागर तरूण जाण सामान्य जीवाला अवघड. त्यातून जाण्यासाठी मग ‘घट’ सोबत असावा लागतो, अशी संकल्पना मांडलेली आहे. पण हा घट रिक्तही नसावा. तो सदविचाराने आणि सत्कृत्याने भरावा लागतो.विश्वास आणि प्रेमाने भरावा लागतो. अहंकारशून्यतेनेही भरावा लागतो. तो रिकामा असेल तर भवसागर तरून जाण दुष्प्राप्य, दुर्घट. हा घट भरलेला ठेवण ही प्रत्येक विवाहित जीवाची एका अर्थाने आध्यात्मिक जबाबदारी असते.

More Information
Publisher Utkarsha Prakashan
Auther B P kalave
Edition 2022
Weight 0.400000
Pages 240
Language Marathi
Binding paperback
ISBN No. 9789391663018
Write Your Own Review
You're reviewing:Ghat Rikama (घट रिकामा )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat