Author : Bapu Tardalkar | Publisher : Bapu Tardalkar |
Translator : - | Category : Author |
ISBN No. : 9789356806511 |

शब्द आणि सुरांशी सूत जुळलेली यंत्रनगरी, इचलकरंजी.
हा इचलकरंजी गावाचा स्थानिक इतिहास आहे. वैभवशाली परंपरा असणारा हा इतिहास तीनशे वर्षापूर्वी पेशवाईच्या प्रारंभ काळापासून सुरू होतो. इचलकरंजी संस्थानांचे पराक्रमी संस्थापक व त्यांच्या शूर वारसदरांनी एकेकाळी सुवर्णयुगात नेलेल्या या संस्थानाने नंतरही नाटक, संगीत, उद्योग अशा क्षेत्रांत बिनीची कामगिरी बजावली आहे. श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या प्रयत्नातून या खेडेवजा गावाचे रूपांतर वस्त्रनगरीत झाले. खुरटलेल्या पाखराने पंखात वीज घेऊन आकाशभरारी घ्यावी असा हा चमत्कार होता. विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारी अनेक व्यक्तिमत्त्वे याच गावात जन्माला आली. हा सर्वच इतिहास भावी पिढ्यांसाठी जपून ठेवावा इतका अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.