Author : Aniruddha Kanisetti | Publisher : Madhushree Publication |
Translator : - | Category : newly-published-new-arrivals |
ISBN No. : 9788195978458 |

चालुक्यांपासून चोलांपर्यंतचा दक्षिण भारत.
भारतीय द्वीपकल्पाचा या काळातील इतिहास नेहमीच अस्पष्ट राहिला आहे. आपल्याला ज्यांची कल्पना करणं जमणार नाही अशा राज्यकर्त्यांमधील युध्दांच्या रुक्ष आणि एकसुरी, कंटाळवाण्या कथांच्या स्वरूपात तो सांगितला गेला आहे. अनिरुध्द कनिसेट्टी यांच्या लॉर्डस ऑफ डेक्कननं भारतीय पुरातत्त्वशास्त्राच्या पुराभिलेख कार्यालयांमध्ये, शिलालेखांमध्ये, ताम्रपटांमध्ये आणि धातूपटांमध्ये धूळ खात पडलेल्या दक्षिण भारताच्या इतिहासाला बाहेर काढलं आहे. अतिशय काटेकोरपणे संशोधन केलेल्या आणि एकाच वेळी चैतन्यशील व विवेकी समंजस शैलीद्वारे सांगितल्या गेलेल्या कथनामुळे लॉर्डस ऑफ द डेक्कन हे पुस्तक अलीकडच्या व्यासंगी विद्वत्तापूर्ण शैलीशी - राजकीय इतिहासाच्या जुन्या परंपरांचा मेळ साधून व्यापक नावीन्यपूर्णतेची निर्मिती करतं. लेखकांनी यासाठी प्रभावी कथाकथनशैलीचा उपयोग करून घेतला आहे. त्यांनी प्रत्येक प्रत्येक राजाचं वैयक्तिक चारित्र्य, राजपरिवारांची रचना आणि जाळी, धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनातील मोठमोठे कायापालट यांची कौशल्यपूर्वक गुंफण केली आहे. त्याच्यातून या महत्त्वाच्या काळातील दक्षिण भारताची एक तर्कसुसंगत, उत्कंठापूर्ण माहिती तयार झाली आहे. यामुळे हा प्रदेश ऎतिहासिकदृष्ट्या केंद्रस्थानी येतो आणि अगदी आजसुध्दा उघड उघड जाणवाणार्या अनेक रूपरेषा व बाह्य आराखडे स्पष्ट होतात.