Mughal Darbarachya Akhabaratil Kille Bhag 1 ( मुघल दरबारच्या अखबारातील किल्ले भाग १ )
Author : Mahesh Tendulkar | Publisher : Snehal Prakashan |
Translator : - | Category : इतिहास-भारत |
ISBN No. : - |

दुर्गप्रेमी, दुर्गअभ्यासक, इतिहास अभ्यास यांच्या दुर्ग या संकल्पनेत वाढ करून त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘मुघल दरबाराच्या अखबारातील किल्ले’ या शीर्षकाखाली पुस्तकांची योजना केली आहे. यात फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नाहीत, तर महाराष्ट्र राज्यातील इतर भागातील किल्ल्यांचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्र राज्याबाहेरील किल्ल्यांचीही दखल यात घेतलेली असून त्याचा उपयोग दुर्गावर लेखन करणारे, सोशल मिडियावर ब्लॉग्ज लिहिणारे आणि फार्सी भाषेचे वर्ग पूर्ण करून, आता काय वाचायचे हा प्रश्न पडणार्या असंख्य इतिहासप्रेमींना इतिहासाच्या अशा पुस्तकांचा नक्की उपयोग होईल.