Author : G K Ainapure | Publisher : Shabd Publication |
Translator : - | Category : कादंबरी संकिर्ण |
ISBN No. : 9788196035129 |

ओस निळा एकान्त म्हणजे मध्यमवर्गात दाखल झालेल्या समकालीन आंबेडकरी जनतेने स्वत:समोर धरलेला आरसा आहे. शोषणाचे कथन आता आत बळले आहे. ही अंतर्मुखता कठोर आत्मचिकित्सेपर्यंत आणि अंतिमत: आत्मभानापर्यंत पोहोचते का हाच खरा प्रश्न आहे. स्त्रीपुरूष नातेसंबंधांचे नवे आयाम, कुटुंबसंस्थेला आलेली अवकळा, आधुनिकता आणि धम्म यांच्या आविष्कारपध्दतींविषयीचे संभ्रम, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही पातळ्यांवरची मूल्यात्मक पडझड या सार्या प्रक्रियांच्या ताण्याबाण्यांनी कादंबरीचा पट विणला आहे.