Prachin Bharatiy Paridhan Shaili ( प्राचीन भारतीय परिधान शैली)
Author : Shweta Kajale | Publisher : Continental Prakashan |
Translator : - | Category : इतिहास-भारत |
ISBN No. : 9789391486099 |

आम्ही आजवर भारतीयविद्या, पुरातत्त्व, सांस्कृतिक इतिहास या विषयीचे ३० पेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. प्रामुख्याने त्यात प्रख्यात इतिहास संशोधक, अभ्यासक, तत्त्वज्ञ स.अ. डांगे, ग.वा.तगारे, प्रा.म.के.ढवळीकर, रं.ना. गायधनी, म.श्री. माटे, पं. महादेवशास्त्री जोशी लिखित अनेक साहित्य, संदर्भ व अभ्यासग्रंथ उपलब्ध आहेत.
या पुस्तकाचा उद्देश प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास लोकांसमोर ठेवणे हा आहे. त्यामध्ये केशभूषा, वेशभूषा, दागिने आणि पादत्राणे यांचा प्रामुख्याने विचार केला आहे. कारण ग्रामीण भारतात आजही हजारो वर्षांपासून चालत आलेली केशभूषा, वेशभूषा, दागिने आणि पादत्राणे परिधान केले जातात. परंतु प्राचीन आणि आधुनिक काळाची तुलना करता त्यामध्ये बरेच अंतर आहे. खरे पाहता प्रत्येक काळात भारतीय लोकांच्या पेहेरावात बदल होत गेला आहे.