{"product_id":"डिझाईन-द-करिअर-design-the-career-dr-rama-marathe-dr-ravi-marathe","title":"Design the career (डिझाईन द करिअर )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eक्षमता आणि आवड यानुसार सुयोग्य करिअरची निवड हा जीवनातील यशस्वितेचा पाया असतो. उभ्या आयुष्याचा फैसला मात्र केला जातो, तुटपुंज्या माहितीवर ! अनेकांना फक्त हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच करिअर्स माहिती असतात. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट... बस्स इतकंच काहीसं ! लक्षात घ्या, अशा ७००हून अधिक करिअर्स आहेत आणि ३०,००० हून अधिक कोर्सेस आहेत. प्रत्येक माणूस हा विशिष्ट शारीरिक भावनिक बौद्धिक सामाजिक-आत्मिक- 'बुद्धिमतांचा कॉम्बो' असतो; आणि प्रत्येक करिअरला विशिष्ट कॉम्बोची गरज असते. या दोन्ही गोष्टी मॅच केल्या की झाले; तुम्ही त्या क्षेत्रात हिरो होणारच ! करिअर निवडीची दिशा चुकल्यास मात्र पश्चात्ताप करण्याची वेळ येते. एकविसावं शतक स्पेशलायझेशनचं आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच उंच जाण्याचं ! तुम्ही त्याच क्षेत्रात उंच जाऊ शकता ज्या क्षेत्रासाठी लागणारा विशिष्ट बुद्धिमत्तांचा कॉम्बो तुमच्यात निसर्गतःच आहे. म्हणूनच योग्य करिअर निवडताना त्या व्यक्तीतील विशेष बुद्धिमत्ता लक्षात घ्यायलाच हव्यात; कारण प्रत्येक मेंदूचं डिझाईन वेगळं असतं ! निरीक्षण, अनुभव यासोबत मानसशास्त्रीय चाचण्या अर्थात सायकॉलॉजिकल टेस्टस्, व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. करिअर सक्सेस प्लॅन साठी महत्त्वाचा आहे शोध व्यक्तिमत्त्वाचा ! ज्यामुळं होईल ओळख आपुली आपणाशी ! आणि सापडेल दिशा जीवनाची ! करिअरची योग्य निवड, निर्णय, नियोजन आणि निश्चितता यासाठी प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं पुस्तक...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : डॉ. रमा मराठे, डॉ. रवी मराठे, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50189198852418,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/design_the_career_1.jpg?v=1753680212","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0-design-the-career-dr-rama-marathe-dr-ravi-marathe","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}