{"product_id":"aadinaad","title":"Aadinaad (आदिनाद)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआदिनाद\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वतः कथा लिहिताना आपला अनुभव आपल्याला पुढे पुढे नेत असतो. दूरवर प्रकाशाचं एक टोक भासमान होतं आणि आपण त्या दिशेने निघतो... ...मी स्वतःच्या लेखनाबद्दलचा एक अनुभव व्यक्त करून पाहते. वाटतं की आपण एका नावेत बसलो आहोत. नावेचं सुकाणू आपल्या हातात नाही. वाट नेईल तिकडे ती नाव जाते नि मग शेवटी एका अज्ञात प्रदेशात येऊन थांबते. तो प्रदेश मला नवीन असतो. तो सुंदर असतोच असंही नाही. तो कुरूपही असू शकतो. पण ते कुरूपपण कलेच्या रंगांनी न्हाऊन निघालेलं असतं. जेव्हा मी इतरांच्या कथा वाचते, इतर भाषेतल्याही कथा वाचते तेव्हा मला माझ्या कथालेखनातली उणीव प्रकर्षाने जाणवते. त्यात काहीतरी कमी आहे हे आतून कळतं; पण नेमकं काय ते कळत नाही... .. सगळंच काही सापडून गेलं असं तर असणार नाही. न सापडलेलं अधिकच असणार याची जाणीव आहे. पण त्याची खंत मात्र नाही. सापडलं नाही त्याच्या पण कथा झाल्याच नं? पण लघुकथा माझ्या हातून निसटली याची खंत वाटते. मला लघुकथेचं सामर्थ्य कल्पनातीत आहे असंच अजूनही वाटतं. माणसाचं संपूर्ण जगणं कथेतून कवेत घेता येत नाहीच; पण जे घेता आलं तेही खूप आहे नं? माझ्या उणिवांसह, मर्यादांसह मी ते स्वीकारलं आहे; कारण त्या मर्यादांच्याही कथा झाल्यात आणि होतीलही...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. आशा बगे \u003cbr\u003eप्रकाशक. मौज प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52984567857474,"sku":null,"price":202.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AadinaadF.jpg?v=1777530033","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aadinaad","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}