Akshardhara Book Gallery
....Aani Raju Jhala Businessmen : Nokaripeksha Vyavsay Kara (...आणि राजू झाला बिझनेसमन : नोकरीपेक्षा व्यवसाय करा !)
....Aani Raju Jhala Businessmen : Nokaripeksha Vyavsay Kara (...आणि राजू झाला बिझनेसमन : नोकरीपेक्षा व्यवसाय करा !)
Share
Couldn't load pickup availability
Author: Suresh Haware
Publisher: Rohan Prakashan
Pages: 193
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
...आणि राजू झाला बिझनेसमन : नोकरीपेक्षा व्यवसाय करा !
नोकरीपेक्षा व्यवसाय करा ! “उद्योग तुमचा पैसा दुसऱ्या” या बेस्टसेलरच्या लेखकाचे नवे पुस्तक! प्रत्येकाला जीवनात उपयोगी पडतील असे यशस्वी उद्योजकाचे अनुभवाचे बोल हळूहळू मराठी तरुण उद्याग करायला लागलाय आणि त्याचप्रमाणे अनेक तरुण त्यासाठी उत्सुक असलेले दिसतायेत… अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंन मराठी माणूस उद्योग करण्यापेक्षा जास्त करून नोकरीच्या शोधात असायचा. मात्र आता मानसिकता बदलते आहे. सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी यासाठी केलेले प्रयत्न आता फळाला येत असलेले दिसत आहेत… जणू ते आता मराठी तरुणांसाठी मेंटॉरच झाले आहेत. या पुस्तकात असलेली राजूची गोष्ट त्यांनी मेंटॉरच्या भूमिकेतूनच सांगितल आहे. डॉ. हावरे राजूला मुंबईतील फॅशन स्ट्रीट, झवेरी बाजार, धारावी, खाऊ गल्ली, पुस्तक गल्ली, फुलमार्केट अशा मोठ्या उलाढाली असलेल्या ‘मार्केट्स’ची ओळखअसलेल्या ‘मार्केट्स’ची ओळख करून देतात. उद्योगाची सुरुवात कशी करावी याचे काही मूलमंत्र देतात… उद्योग का करावा? कर्ज घेण्यातील बारकावे उद्योगाची भाषा नेटवर्किंग बदललेल्या विक्री व्यवस्थापनाचे मंत्र निर्णय प्रक्रिया व्यवसायातील चढउतार… आणि उद्योगाच्या अशा विविध पैलूंची माहिती राजूला उपयोगी पडते आणि मग राजू होतो यशस्वी ‘बिझनेसमन’ ! उद्योग सुरु करण्यासाठी, तो यशस्वी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी गोष्टीरुप मार्गदर्शन करणारं परिपूर्ण पुस्तक … आणि राजू झाला बिझनेसमन !
लेखक. सुरेश हावरे
प्रकाशन. रोहन प्रकाशन
