{"product_id":"aapula-thavo-n-sandita","title":"Aapula Thavo N Sandita (आपुला ठावो न सांडिता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआपुला ठावो न सांडिता\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसुरेंद्र दरेकरांच्या कथा पुनर्वाचनात अधिक आनंद देतात, पण ती काही या कथा वाचायची पूर्वअट नव्हे. दोन स्तरांवर दरेकरांची कथा वाचकाला समृद्ध करते असा याचा अर्थ. पृष्ठभागावर अतिशय संयत आणि प्रगल्भ हाताळणीने ते मानवी नात्यांचे अन्वयार्थ शोधत अनाग्रही शैलीत वाचकाला अंतर्मुख करतात तर पुनर्वाचनात कथेचे खोल तत्त्वज्ञानात्मक अंतःस्तर उलगडतात आणि मौलिक, तात्त्विक आशयाने वाचक स्तिमित होतो. 'आपुला ठावो न सांडिता'चे सुप्तकेंद्र असलेली मिशेल तसेच 'अवचिता परिमळू'मधली मंजू काय किंवा 'विकल्पाचिया वाटा'मधली शुभा काय, या नायिका जगणे मौलिक करण्याच्या प्रवासात 'जग आणि जगणे' याची आपलीही जाण उन्नत करतात. तेच तर अभिजात साहित्याचे प्रयोजन. मराठी साहित्यातली संयत आणि प्रगल्भ कथेची वाट दरेकर आपल्या मौलिक कथेने सशक्त करून पुढे नेत आहेत. त्यामुळे उन्नत अभिरुचीच्या वाचकांना या कथा अतिशय समृद्ध अनुभव देतात. तपशील समृद्ध असलेल्या या कथा आक्रमक किंवा आक्रस्ताळा सूर न पकडता अनाग्रही शैलीत वाचकाशी प्रातिभ भागीदारी करतात. आवर्जून वाचायला हव्या अशा या कथा आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुरेंद्र दरेकर \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916210958658,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AapulaThavoNSanditaF.jpg?v=1775970988","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aapula-thavo-n-sandita","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}