{"product_id":"aarogyam-sarvarth-sadhanam","title":"Aarogyam Sarvarth Sadhanam (आरोग्यम सर्वार्थ साधनम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआरोग्यम सर्वार्थ साधनम\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंपूर्ण आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक सुदृढता. केवळ शरीर धष्टपुष्ट असणे आणि सर्वसाधारणपणे रोगापासून दूर राहणे संपूर्ण आरोग्यासाठी पुरेसे नाही. आपले मनही सुदृढ आणि सक्षम असले पाहिजे. आपले आरोग्य आपल्या एकंदरीत जीवनशैलीवर अवलंबून असते. आपण कोणत्या वातावरणात राहतो, कोणता आहार घेतो, किती शारीरिक श्रम किंवा व्यायाम करतो, आपल्याला कोणत्या सवयी किंवा व्यसने आहेत आणि आपली भावनिक मनःस्थिती कशी आहे आणि आपण ताणतणावापासून किती दूर आहोत इ. गोष्टींवर आपले संपूर्ण स्वास्थ्य निर्भर असते. त्या दृष्टिकोनातून 'आहार-विहार, आचार-विचार' चतुःसूत्रीचा समन्वय साधून संपूर्ण आरोग्याची प्राप्ती कशी करायची ह्याचा उहापोह सदर पुस्तकातून केलेला आहे. डाएटिंग, उच्च रक्तदाबावरील औषधा व्यतिरिक्त इतर उपचार, हृदय रोगाची कारणे, लक्षणे, उपचार व प्रतिबंध, कोलेस्टरॉलबद्दल वस्तुस्थिती, फळे व भाज्यांचे आहारातील महत्त्व, प्रोस्टेट ग्रंथीचे विकार, लसूण, लिंबू, आवळे ह्यांमधील विशेष आरोग्य गुण स्वास्थ्यासाठी स्वरयोग, रोगहारक आरोग्य वचने, ताणतणाव निवारणासाठी उपाय इ. अनेक उपयुक्त स्वास्थ्याविषयक लेखांचा हा एक अप्रतिम संग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e लेखक. उद्धव कुळकर्णी \u003cbr\u003eप्रकाशक. नंदिनी पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53000680538434,"sku":"NAND0024","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AarogyamSarvarthSadhanamF.jpg?v=1777785842","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aarogyam-sarvarth-sadhanam","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}