{"product_id":"adamura-अदमुरं","title":"Adamura (अदमुरं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअदमुरं \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"जगी घाण नि चिखलच सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा \u003cbr\u003eपदोपदी मज कमळ घालते गुणगंधाचा नवा उखाणा.\"\u003cbr\u003eबोरकरांप्रमाणेच श्रेयालाही अवघी सृष्टी पदोपदी गुणगंधाचा उखाणा घालत असते आणि तो गुणगंध इतरांनीही अनुभवावा ही असोशी तिच्या लेखणीतून झरते. \u003cbr\u003eपुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच तिचं लिखाण ताज, अलवार, मधुर आहे. ते मुक्तछंद काव्य आहे की लयदार गद्य हे ठरवणं कठीण आहे पण तशा कोणत्याच साच्यात न बसवता आपण त्यात रममाण होतो. \u003cbr\u003eयात वर्णिलेल्या घटना तुमच्या-आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्याच. मग वेगळेपण काय ? तर एरवी त्रासदायक वाटणाऱ्या प्रसंगांकडे बघण्याची श्रेयाची सौंदर्यदृष्टी, 'अतिपरिचयातब अवज्ञा' झालेल्या भवतालाची दखल घेणं, त्याला दाद देणं. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : श्रेया राजवाडे \u003cbr\u003eप्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54528908525890,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ADAMURAF.jpg?v=1781097524","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/adamura-%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}