{"product_id":"akhada","title":"Akhada (आखाडा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआखाडा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eगीता आणि बबिता यांच्या विजयामुळे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडून आला. \"देशाच्या मागासलेल्या, ग्रामीण, अविकसित भागात राहत असलेल्या मुलींच्या आई-वडिलांना आमच्या यशामुळे प्रेरणा मिळाली. त्यांनी आपल्या मुलींना खेळात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. बलालीपासून दूर असणाऱ्या खेड्यापाड्यांमधून आणि जिल्ह्याच्या ठिकाणांहून प्रवास करून लोक मुद्दाम बलालीला माझ्या वडिलांची भेट घेण्यासाठी येऊ लागले. आपल्या मुलींनी क्रीडा क्षेत्रात नाव कमवावं, यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, असा सल्ला ते माझ्या वडिलांना विचारू लागले. मुली या मुलांपेक्षा कमजोर असतात, त्यांना क्रीडाक्षेत्रात काहीच भविष्य नाही, अशासारखे जे गैरसमज समाजात पसरलेले होते, ते दूर होण्यास आमच्या या विजयामुळे मोठी मदत झाली. स्त्रियांना आपल्या समाजात जी दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात येत होती, त्यात बदल घडून आला आणि हे काम करण्यात आमची अप्रत्यक्षपणे मदत झाली याचा मला फार आनंद वाटतो. आता मुली केवळ प्रेक्षक म्हणून मागे न राहता प्रकाशात आल्या आहेत, त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e मुखपृष्ठ छायाचित्र - करुण शर्मा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e मलपृष्ठ छायाचित्र - सॅम्युएल\u003c\/span\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सौरभ दुग्गल \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : लीना सोहोनी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54946079867202,"sku":null,"price":132.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AkhadaF.png?v=1783055315","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/akhada","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}