{"product_id":"akherache-parv","title":"Akherache Parv (अखेरचे पर्व)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअखेरचे पर्व\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपंडित ऐकत होते. ऐकत असताना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा पट त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होता. त्या आयुष्याने काय दिले? क्षणिक आनंद मिळालाही असेल; पण शारदाच्या मनात आहे तसा स्थिर आनंद, तृप्ती ? शारदा म्हणाली तेच खरं. दोन मार्ग असतात- एक स्वतःला उधळण्याचा आणि दुसरा स्वतःला रुजवण्याचा, राखण्याचा. त्या वेळी तो दुसरा मार्ग दिसलाच नाही; दिसला असता तरी तो स्वीकारला गेला नसता. आज मात्र वाटते की, तो दुसरा मार्गच खरा! अजून रुजता येईल का? ते रुजलेपण केवढे सामर्थ्य देते ! ते सामर्थ्य जवळ होते म्हणूनच शारदा आपल्याला परत बोलावू शकली. आयुष्यातील खंत, हेवेदावे, कटुता यांच्या पलीकडे जाण्याची दिशा दाखवणारे सामर्थ्य आपल्याला कधी मिळेल का ? 'अखेरचे पर्व' हा ख्यातनाम लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला हा कथासंग्रह. विजयाबाई आपल्या आसपास घडणाऱ्या, अगदी साध्या वाटणाऱ्या घटना-प्रसंगांवर तसेच एखादी व्यक्ती किंवा त्यांना भेटलेली, भावलेली वेगळी माणसे (मग ती सामान्य का असेनात!) किंवा कोणताही शब्द (उदा. आभाळ, उद्ध्वस्त, खेळ, संयोग, अश्मा) असो; त्यावर सहज, ओघवत्या शैलीत वाचनीय कथा लिहितात. हे सर्व त्या कोणताही अभिनिवेश न बाळगता सहजपणे एखाद्या व्यक्तीला गोष्ट सांगावी इतक्या हळुवारपणे, प्रत्ययकारी पद्धतीने लिहितात. तरल वच संवेदनशील शैलीमुळे अशा कथा वैशिष्ट्यपूर्ण आणि वाचनीय ठरतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विजया राजाध्यक्ष \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52103807762754,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AkhercheParvF.jpg?v=1772172060","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/akherache-parv","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}