{"product_id":"amrutapulin","title":"AMRUTAPULIN (अमृतपुलिन)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eअमृतपुलिन\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eएक प्रसन्न सोनेरी पहाट ! निशानाथाने आपले प्रेमाचे नाटक संपविले होते. त्या प्रीतीच्या रंगभूमीवरील एक एक दिवा हळूहळू विझत होता आणि वातावरणात एक प्रसन्नपणा आला होता, पण अशा या प्रसन्न पहाटेच्या वेळी हिरणचा चेहरा मात्र कसा सुकलेल्या फुलासारखा दिसत होता. हिरण एकटीच उदयपूरच्या राजवाड्यामागील बगिच्यात उभी होती. खरं तर दररोज या वेळेस ती देवासाठी फुलं खुडायला जात असे, पण आज तिचा मुखचंद्र अतिशय म्लान झाल्यासारखा वाटत होता. जसा आकाशातील चंद्र आता जायचे म्हणून उदास झाला होता, जणू त्याचे प्रतिबिंबच हिरणच्या चेहेऱ्यावर पडलेय की काय असा भास होत होता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : ननिलाल बंदोपाध्याय \u003cbr\u003eप्रकाशन : मिहाना प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52271986966850,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/amrutpulin-f.jpg?v=1773229377","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/amrutapulin","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}