{"product_id":"an-incomplete-life","title":"An Incomplete Life  (अॅन इनकम्प्लीट लाइफ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअॅन इनकम्प्लीट लाइफ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी २०१५ मधील एका अनपेक्षित घटनेमुळे रेमंड समूहाचे माजी मानद अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांना, त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलेल्या कंपनीतून सक्तीची निवृत्ती घ्यावी लागली व स्वतःच्या प्रिय राहत्या घराचा त्याग करावा लागला. भारताच्या या विख्यात उद्योगपतीला हे सारं परत मिळवण्यासाठी आज लढा द्यावा लागतोय. अत्यंत क्लेशदायी बालपण, पुढे रेमंडसाठी अनेक दशकं झटून केलेलं काम व त्यानंतर वाट्याला आलेलं वादळी आयुष्य, हा थक्क करणारा प्रवास त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून उलगडला आहे. नामांकित सिंघानिया घराण्यात जन्म घेतलेले विजयपत यथावकाश आपल्या खानदानी व्यवसायाची धुरा सांभाळणार हे अपेक्षितच होतं. पण त्याच वेळी मनाला लागलेला आगळावेगळा ध्यासही त्यांनी पूर्णत्वास नेला. त्यांनी आपला हवाई साहसांचा छंद जपला, जोपासला आणि निष्णात वैमानिकाचं कसब व प्रभुत्व सिद्ध करत दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. काही काळ प्राध्यापकीही केली आणि मुंबईचे शेरीफ होण्याचा बहुमान मिळवला. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली रेमंड समूहाने अनेक नव्या क्षेत्रांत आपला जम बसवत अल्पावधीतच 'वस्त्रोद्योगातील विश्वासार्ह नाव' असा लौकिक प्राप्त केला. आणि मग एक चुकीचं पाऊल पडलं व दुर्दैवाचा फेरा सुरू झाला... दिलखुलास, प्रांजळ व मन हेलावणारं 'अॅन इनकम्प्लीट लाइफ' हे प्रत्यक्षात एका मनसोक्तपणे जगलेल्या पण पश्चात्तापाच्या आणि हृदयभंगाच्या जहरी डंखाने व्याकूळ झालेल्या आयुष्याचं अनोखं दर्शन आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. विजयपत सिंघानिया \u003cbr\u003eअनुवादित लेखक. दीपक कुळकर्णी \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52852167737666,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AnIncompleteLifeF.jpg?v=1775543232","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/an-incomplete-life","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}