{"product_id":"anadi-anant","title":"Anadi Anant (अनादि अनंत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eअनादि अनंत \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'अनादि अनंत' हा संग्रह पंकज कुरुलकर यांच्या कथालेखनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. वीस वर्षांनंतरही या कथा आजच्या बदललेल्या महानगरी वास्तवात तितक्याच अर्थपूर्ण वाटतात. मराठी कथेतून महानगरी जीवनाचा शोध यापूर्वीही अरुण साधू, ह. मो. मराठे अशा लेखकांनी घेतलेला आहे. कुरुलकरांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या कथा शहरी जीवनातल्या एका विशिष्ट कोपऱ्याचंच चित्रण करत नाहीत. अंतर्विरोधांनी भरलेल्या, अनाकलनीय वाटणाऱ्या समग्र महानगरी वास्तवाचा ते वेध घेऊ पाहतात. उच्चभ्रू - एलीट, मध्यमवर्गीय, झोपडपट्टीत राहणारे, गुन्हेगार, भिकारी अशा अनेक स्तरांमध्ये विभागलेल्या समाजाला एकाच कथासूत्रात गुंफताना कुरुलकरांची कथा नकळतपणे एक अतिवास्तव वातावरण निर्माण करते. ती एकाच वेळी कल्पिताचा आधार घेते आणि जळजळीत वास्तवाची अनुभूती देते. मंदिरांचा व्यवसाय करणारा नास्तिक, सगळेच व्यर्थ आहे असं वाटणारा मोठ्या उद्योगपतीचा मुलगा अशा विरोधाभासी ताणातून कुरुलकरांच्या कथेचा नाट्यात्म अवकाश जिवंत होतो. धर्म म्हणजे मास हिस्टेरिया आहे, आदर्श व्यवस्था हा भ्रम आहे, सत्ता माणसाला भ्रष्ट करते, राजकारण हा क्रूर लोकांचा खेळ आहे, अशा प्रकारचा सिनिसीझम हा या कथांचा बाह्य स्तर आहे. पण या कथांचा अंतस्तर रक्तापलीकडच्या मानवी नात्यांचा शोध घेणारा असल्यामुळे या कथा एका वेगळ्या स्तरावर पोचतात.__ \u003cstrong\u003eदीपक घारे\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : पंकज कुरुलकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54995438567746,"sku":null,"price":449.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ANANDIANANDF.jpg?v=1784295502","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/anadi-anant","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}