Andharya Gallit Pandhare Thipake (अंधाऱ्या गल्लीत पांढरे ठिपके) By Himanshi Shelat, Sushma Lele
Andharya Gallit Pandhare Thipake (अंधाऱ्या गल्लीत पांढरे ठिपके) By Himanshi Shelat, Sushma Lele
Share
Author:
Publisher: Sahitya Akademi
Pages: 125
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Andharya Gallit Pandhare Thipake (अंधाऱ्या गल्लीत पांढरे ठिपके)
Authr : Himanshi Shelat, Sushma Lele
१९८७ साली हिमांशीबेन शेलत यांचा अंतराल हा पहिला-वहिला कथासंग्रह प्रकशित झाला आणि आधुनिक आणि आधुनिकवादाची वैशिष्ट्ये ओळखून, त्याच्या तंत्राच्या मर्यादा पारखून आपले लेखन करणारी एक नवी पिढी अस्तित्वात आली. हिमांशीबेन या पिढीत अग्रस्थानी होत्या. आपला गमावलेला वाचकवर्ग पुन्हा मिळवण्याची सुरुवात हिमांशीबेनच्या कथेने झाली. आशय आणि अभिव्यक्तिची एकरूपता हे हिमांशीबेनच्या कथांच्या श्रेष्ठत्त्वाचे गमक आहे. तंत्राच्या फंदात न पडता त्यांची कथा स्वतःचा असा एक घाट बनवते. गुजराती कथा वाङ्मयाला त्यांच्या कथेमुळे पुन्हा सुगीचे दिवस आले... हिमांशीबेनची एकूण सात कथासंग्रह, एक कादंबरी, दोन लघुकादंबऱ्या, दोन निबंधसंग्रह, दोन स्मृतीकथा, काही अनुवाद आणि काही संपादने मिळून तिसेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अंधारी गलीमां सफेद टपकां या त्यांच्या कथासंग्रहाने गुजराती वाचकाला त्यांच्या प्रतिभासामर्थ्याची ओळख तर घडलीच शिवाय गुजराती कथा वाङ्मयात त्यामुळे मोलाची भरही पडली. त्यांच्या अंधारी गली मांला तसेच इतरही बऱ्याच पुस्तकांना विविध पारितोषिके मिळाली आहेत. हिमांशीबेन यांचे लेखन आजही सातत्याने सुरूच आहे आणि वाचकांना आवडते आहे.