{"product_id":"ashi-manse-yeti","title":"Ashi manse yeti (अशी माणसे येती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअशी माणसे येती \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"मग काय जोशी?\" आप्पासाहेब म्हणाले,\" केव्हापासून येणार लिहायला?\" \"आपण सांगाल तेव्हापासून मी येत जाईन,\" मी म्हटलं. \"ठीक आहे; तर मग उद्या सकाळी नऊ वाजता या आणि हे पाहा, मी तुम्हाला महिन्याला तीस रुपये देत जाईन. गैरहजर राहिलात तर खाडा धरीन, चालेल ना?\" सारा व्यवहार स्पष्ट आणि रोखठोक होता. द्रव्यार्जन हा काही माझा हेतू नव्हता. प्रा. ना. सी. फडके यांचा सहवास लाभणं, त्यांच्या लेखनप्रक्रियेत सहभागी होण्याचा अनुभव घेणं हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. मी त्यांना म्हटलं, \"आपल्याकडे लेखन करायला मिळणं, एवढाच माझा हेतू आहे. त्याच्या मोबदल्याचा विचार माझ्या मनात नाही. आपण सांगाल ते मला मान्य आहे.\" \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्याला थोरा-मोठ्यांच्या सहवासाबरोबरच त्यांच्याकडून काही शिकायला मिळावे; तसेच प्रेरणा, स्फूर्ती आणि मार्गदर्शन लाभावे या सद्हेतूने वसंत जोशी यांनी अनेक नामवंत व्यक्तींशी संपर्क साधून नाते जोडले. अशा अनेक व्यक्तींविषयी आलेले अनुभव व आठवणींना जोशी यांनी शब्दरूप दिले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ.वसंत जोशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943437422914,"sku":null,"price":114.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AshimanseyetiF.png?v=1782976360","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ashi-manse-yeti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}