Akshardhara Book Gallery
Ashtadarshane (अष्टदर्शने)
Ashtadarshane (अष्टदर्शने)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vinda Karandikar
Publisher: Popular Prakashan
Pages: 85
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अष्टदर्शने
‘अरीस्टोटलचे काव्यशास्त्र’चे भाषांतर आणि ‘अमृतानुभावा’चे अर्वाचीनीकरण करण्याचा अनुभव पाठीशी असणाऱ्या विंदा करंदीकर यांचा ‘अष्टदर्शने’ हा नवा उपक्रम. ज्या उद्देशाने त्यांनी आधीचे दोन उपक्रम केले तोच उद्देश ‘अष्टदर्शने’मागेही आहे. मराठी वाचकांना देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे आणि बर्गसॊ या सात पाश्चात्य आणि चार्वाक या भारतीय तत्त्वज्ञांची आणि त्यांच्या विचारांची ओळख करून देणे या हेतूने विंदांनी या छोट्याशा पुस्तकाची रचना केली. कवीचा पिंड असणाऱ्या विंदांनी यासाठी ‘अभंग’ या रचनाप्रकाराची निवड करणे साहजिकच होते.
चिंतनगर्भ कविता लिहिणाऱ्या आणि तत्त्वज्ञानाची ओढ असणाऱ्या विंदांची अभंग या साहित्यप्रकारावर असलेली हुकमत यामुळे हे तत्त्वकाव्य अगदी सोप्या सुलभ स्वरुपात वाचकांपुढे येते. विंदा करंदीकारांसारख्या असामान्य प्रतिभेच्या कवीचे शब्द आणि डॉ. शि. स. अंतरकर या तत्त्वज्ञान विषयातील तज्ज्ञ व्यक्तीची प्रस्तावना यामुळे आशयदृष्ट्या हे पुस्तक सखोल तरीही वाचनीय बनले आहे.
लेखक. विंदा करंदीरकर
प्रकाशक. पॉप्युलर प्रकाशन
