Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Atmahatya Annadatyanchya... Rog Ek, Nidan Dusar An Upchar Tisara...(आत्महत्या अन्नदात्याच्या... रोग एक, निदान दुसरं अन उपचार तिसरा..)

Atmahatya Annadatyanchya... Rog Ek, Nidan Dusar An Upchar Tisara...(आत्महत्या अन्नदात्याच्या... रोग एक, निदान दुसरं अन उपचार तिसरा..)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ad.Dr.Prashant Kayande

Publisher: Sharayu Prakashan

Pages: 446

Edition: latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Atmahatya Annadatyanchya... Rog Ek, Nidan Dusar An Upchar Tisara...(आत्महत्या अन्नदात्याच्या... रोग एक, निदान दुसरं अन उपचार तिसरा..)

आत्महत्या अन्नदात्याच्या... रोग एक, निदान दुसरं अन उपचार तिसरा..

अॅड. डॉ. प्रशांत गणपतराव कायंदे यांचा परिचय 

अॅड. डॉ. प्रशांत गणपतराव कायंदे हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग एक या राजपत्रित पदावर कार्यरत होते. त्यांनी शासनसेवा एक जनसेवेचे व्रत समजून प्रामाणिकपणे केली. त्यांनी शासन सेवेत वर्ग २ ते १ पर्यंत विविध पदावर कार्यरत असताना गरीब शेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध योजनांमधील होणाऱ्या भ्रष्टाचाररूपी प्रवाहाविरोधात पोहून संघर्षमय असा एकाकी लढा दिला, तो अजुनही चालु आहे. सेवानिवृत्त होताच त्यांनी मुंबई उच्च न्यायालय व इतर न्यायालयामध्ये अॅडव्होकेट म्हणुन कायद्याची प्रॅक्टीस सुरु केली व ती अजूनही चालू आहे. या दरम्यान योगशास्त्रातील पदवी, पदव्युत्तर ते डॉक्टरेटच्या पदव्या संपादन. योग शिक्षक म्हणुन योग शिक्षणाचे कार्य, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणुन सामाजिक कार्य, स्वामी विवेकानंद प्रेरित समग्र सुधार मंडळ या सेवाभावी संस्थेची स्थापना व त्या माध्यमातून नाव, पैसा व प्रसिध्दी यापासून दूर राहून स्वामी विवेकानंदाच्या तत्वावर आधारित गरीबांची व गरजू लोकांची सेवा करण्याचे सामाजिक कार्य केले व ते अजूनही चालू आहे. श्रीमद्भगवद्गीतेमधील तसेच स्वामी विवेकानंदाचे जीवनविषयक तत्वज्ञान हे त्यांचे मार्गदर्शक असून भगवान श्रीकृष्ण व स्वामी विवेकानंद हे त्यांचे प्रेरणास्थान असलेले आराध्य दैवत आहेत. त्यांना वाचन, लिखानाची अत्यंत आवड असून त्यांचे यापूर्वी एक पुस्तक व बरेच संशोधनपर लेख प्रकाशित झाले असून बऱ्याच पुस्तकावर त्यांचे लिखानाचे काम चालू आहे.

लेखक: अॅड. डॉ. प्रशांत गणपतराव कायंदे
प्रकाशक: शरयू प्रकाशन 

View full details