{"product_id":"aurangzeb","title":"Aurangzeb (औरंगजेब)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eऔरंगजेब\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि उत्तर कालीन मुघल\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाफिरांवरील लादलेला जिझ्या कर हा औरंगजेबाच्या दृष्टीने केवळ आर्थिक विषय नव्हता, \u003cbr\u003eत्याच्या दृष्टीने तो प्राधान्याने धार्मिक विषय होता, हे या खालील प्रसंगावरून स्पष्ट होते. \u003cbr\u003eहमीदुद्दीनखान याने संकलित केलेल्या अहकाम-इ आलमगीरीत सांगितला आहे, तो असा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"इस्लामपुरी येथे असलेल्या तळाचे रक्षण आणि ब-हाणपूर पासून हुजुरांपर्यंतच्या रस्त्याचे रक्षण \u003cbr\u003eया कामांवर खान फीरूझजंग याला नेमले होते. त्याचा अर्ज आला की 'माझ्या आईचा मकबरा \u003cbr\u003eभीमा नदीच्या तीरावर आहे. तेथील बाजारामुळे बादशाही छावणीत भरपूर रसद येते, म्हणून त्याची \u003cbr\u003eभरभराट होणे (आबादी) जरूर आहे. तेथील रहिवासी असलेल्या हिंदूंना जिझ्याची माफी दिल्याशिवाय \u003cbr\u003eहे पार पडणार नाही. इनायतुल्लाखानाने जिझ्याची माफीची सनद पाठवावी असा हुकूम व्हावा.\u003cbr\u003e' यावर बादशाहांचे दस्तखत झाले म्हणजे औरंगजेबाने स्वतः शेरा लिहिला की 'आम्ही मार्गभ्रष्टांपासून \u003cbr\u003eम्हणजे मुसलमानेतरांकडून मदत घेत नाही. मकबऱ्याच्या बाजाराची भरभराट इच्छिणे आणि \u003cbr\u003e'काफिर स्वतःच्या हाताने जिझ्या देईपर्यंत आणि नम्र होईपर्यंत त्यांच्याशी युध्द करा' या पवित्र कुराणातील\u003cbr\u003e जिझ्या विषयीच्या हुकुमात 'माफीलायक होईपर्यंत' असे पदरचे शब्द घालणे शहाणपणापासून व \u003cbr\u003eआदरणीय शराच्या म्हणजे इस्लामी कायद्याच्या पालनापासून हजार कोस दूर आहे हे आमची प्रवृत्ती \u003cbr\u003eजाणणाऱ्या त्या निष्ठावान सेवकास म्हणजे खान फीरूझजंग यास ठाऊक आहे. उघड आहे की अत्यंत \u003cbr\u003eहीन व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा असा सोबत्यांचा एक गटतुमच्या मार्गभ्रष्टतेस कारणीभूत \u003cbr\u003eआहे आणि त्याने तुमच्या मनात कुजक्या मांसाच्या लालसेला जागा दिली आहे. पण हा अनुभवी वृध्द \u003cbr\u003eम्हणजे स्वतः औरंगजेब या आकर्षणात कसा फसेल? यावर शेवटी औरंगजेबाने केलेले मार्मिक काव्य, \u003cbr\u003eजे असे कि, 'जा, हा सापळा दुसऱ्या एखाद्या पक्षास लाव कारण अनकाचे घरटे खूप उंचावर आहे.' \u003cbr\u003eअनका हा फक्त नावाने ज्ञात असणारा पण प्रत्यक्षात कधीही न मिळणारा काल्पनिक पक्षी आहे, \u003cbr\u003eम्हणूनच मिळण्यास कठीण किंवा अशक्य गोष्ट असाही एक अर्थ त्या शब्दाला प्राप्त झाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिझ्या माफीसारख्या सवलती दिल्या तर व्यापारी बाजारात दुकाने थाटतील आणि त्यामुळे लष्कराला \u003cbr\u003eभरपूर रसद मिळत राहील हे खान फिरूझजंग याचे म्हणणे लष्करी दृष्ट्या अगदी वाजवी होते. पण \u003cbr\u003eऔरंगजेबाला धर्मापुढे आर्थिक बाबींची जशी पर्वा राहिली नव्हती तशीच लष्करी बाबींचीही राहिली \u003cbr\u003eनव्हती. त्याच्या दृष्टीने धर्माचरण, म्हणजेच कुराणाचे पालन, महत्त्वाचे होते आणि धिम्मींकडून \u003cbr\u003e(काफिर हिंदूंकडून.... ) ते जिझ्या देत नाहीत तोपर्यंत युध्द करा असा कुराणाचा हुकूम आहे. \u003cbr\u003eजिझ्या लावण्याकरता तो हुकूम त्याला शिरोवंध होता आणि पुरेसा होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eलेखक : गजानन भास्कर मेहेंदळे\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56207637020994,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AURANGJEBF.jpg?v=1789798123","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aurangzeb","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}