{"product_id":"balee-बळी","title":"Balee (बळी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबळी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबळी म्हणजे केवळ चक्रवर्ती सम्राट नव्हे, तर त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवलेला आणि प्रजेने काळजात चिरकाळ जपून ठेवलेला चिरंजीवी राजा! न्याय, प्रेम आणि समृद्धीने त्रैलोक्य उजळून टाकणारा दानवीर ! महाबली बळी राजा नेमका कोण होता? दानशीलतेचे सर्वोच्च शिखर गाठणारा बळी राजा नेमका कसा होता ? युद्धात त्याचा पराक्रम विजेसारखा झळाळत होता.. सभेत त्याचा विचार समुद्रासारखा खोल होता.. आणि त्याचे प्रजेवरचे प्रेम वसंतासारखे बहरलेले होते. परंतु त्याच्या ह्या भव्यतेच्या आड दडले होते; संघर्ष, विश्वासघात आणि नियतीचे खेळ. बळी राजाचे हृदय जितके विशाल होते, तितकेच हळवेही होते. प्रेम, मैत्री, नातेसंबंध ह्यांच्यात संतुलन राखणारा हा राजा शेवटी कोणत्या निर्णायक क्षणी नियतीसमोर नतमस्तक झाला ? आजही ‘इडा पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे!’ असे आपण म्हणतो, ते बळीचे राज्य नेमके कसे होते ? बळीच्या राज्याच्या अद्वितीय काळाचे जिवंत दर्शन ह्या कादंबरीतून सर्वांना अनुभवायला मिळते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : अंजली दासखेडकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51308683657538,"sku":"9788199140332","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Balee-F.jpg?v=1758188544","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/balee-%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}