{"product_id":"balidan-बलिदान","title":"Balidan (बलिदान)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबलिदान \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"खाली तळघर आहे. तळघरात हातभर लांब, तितकाच रुंद आणि तितकाच उंच असा एक चांदीचा पिंजरा आहे. त्या पिंजऱ्यात ते आहे. दिसायला एखाद्या म्हाताऱ्या, कुरूप चेहऱ्याच्या माणसासारखं दिसतं. \u003cspan\u003eतेच त्याचं खरं रूप आहे का नाही, नेहमी तसंच असतं का बदलतं, मला माहीत नाही. तो आपल्या घराण्याचा कोणी मूळपुरूष आहे का? माहीत नाही. आपल्या पूर्वजांपैकी कोणी काही कठीण साधना करून त्याला वश करून घेतला आहे का? का काही युक्तीप्रयुक्तीने त्याला 'बांधून ठेवला आहे का? मला माहीत नाही. पिंजरा चांदीचा का? चांदीच्या काही खास गुणधर्मासाठी आहे का? का तोही आपला एक संकेत आहे? मला माहीत नाही. पिंजऱ्याचे गज तसे बारीकच आहेत. सहज वाकवता किंवा तोडता येण्यासारखे आहेत. मग त्याने ते का केलं नाही? त्याची इच्छा नाही का त्याला शक्य नाही? मला माहीत नाही. ते नेहमी पिंजऱ्यातच असतं का आणखी कोठे जातं? मला माहीत नाही, जेव्हा जेव्हा मी तळघरात गेलो आहे तेव्हा तेव्हा ते पिंजऱ्यात होतं. पण इतर वेळी?'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : नारायण धारप \u003cbr\u003eप्रकाशक : मनोरमा प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54665150529858,"sku":"0290","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BALIDANF.jpg?v=1781874339","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/balidan-%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}