{"product_id":"bhagat-singh","title":"BHAGAT SINGH (भगतसिंग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBHAGAT SINGH (भगतसिंग)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eनिवडक भाषणे व लेखन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभगतसिंग हे थोर देशभक्त आणि क्रांतिकारक समाजवादी होते. पण त्याचबरोबर भारतातील सुरूवातीच्या काळातील ते एक मार्क्सवादी विचारवंत आणि विचारसरणी- चिंतक (ideologue) होते. अगदी लहानपणापासून त्यांना वाचनाने झपाटून टाकले होते. त्यांच्या बहुआयामी वाचनाचा त्यांच्या विचारावर व लेखनावर प्रभाव पडला आहे. भगतसिंग यांनी न्यायालयात केलेली कित्येक निवेदने, त्यांनी आपल्या वडिलांना व कॉम्रेड्सना उत्कटतेने लिहिलेली पत्रे, क्रांती व जातीयवादाविषयीची त्यांची मर्मदृष्टी आणि नास्तिकतेवरील त्यांचा अढळ विश्वास या सर्वांतून एकाच वेळी स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या व पूर्णपणे विकसित झालेल्या मनाचा प्रत्यय येतो. भगतसिंग यांचे लेखन विविधांगी आहे. त्यांच्या जन्मशताब्दीच्या खास प्रसंगी आणि त्यांच्या हौतात्म्याला झालेल्या पंचाहत्तराव्या वर्षाचे स्मरण करताना त्यांची भाषणे, लेखन व पत्रे यांचा निवडक लेखसंग्रह वाचकांच्या हाती देताना नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाला अभिमान वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंकलक: डी.एन.गुप्ता \u003cbr\u003eअनुवाद: रमेशचंद्र पाटकर \u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55993372934466,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bhagadtsingh-f.jpg?v=1787656312","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bhagat-singh","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}