Bhannatshodh (भन्नाटशोध) By Achyut Godbole, Amruta Deshpande
Bhannatshodh (भन्नाटशोध) By Achyut Godbole, Amruta Deshpande
Share
Author: Achut Godbole
Publisher: Krishna Publications
Pages: 240
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Bhannatshodh (भन्नाटशोध)
Author : Achyut Godbole, Amruta Deshpande
या विश्वात माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, जो सतत काहीतरी नवं शोधू पाहत असतो. माणसाच्या या शोधक वृत्तीमुळेच हे जग पूर्वीपेक्षा इतकं बदललंय की, पंचमहाभूते सोडून जवळपास अन्य सगळ्याच गोष्टी मानवनिर्मित आहेत आणि त्या आधुनिक जगाला नव्यानं आकार देत आहेत. नावीन्याचा ध्यास असलेल्या माणसानं स्वतःच्या सोयीसाठी नवी उपकरणं आणि वस्तू शोधल्या म्हणूनच तर आपलं जगणं आधीपेक्षा सोपं, सुकर आणि आरामदायी होऊ शकलं. "To err is human.' हे आपण आजवर ऐकत आलोय, पण आता "To engineer is human,' असंच म्हणावंसं वाटतं. बरं, हे सगळे शोध कोणी हेतुपुरस्सर शोध लावायचे म्हणून संशोधन करून किंवा प्रयोगशाळेतही लावलेले नाहीत. कित्येक शोध हे सर्वसामान्य माणसांनी स्वतःचं किंवा आपल्या जवळच्या लोकांचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून लावले; पण या शोधांनी केवळ एका समूहाचं नाही, तर अखिल मानवजातीचं जीवन सहजसोपं केलं हे मात्र विसरता येत नाही. सुई-गुंडी, सेफ्टी पीन, चप्पल-बूट, ब्रश-टूथपेस्ट, साबण, रस्ते, लिफ्ट अशा रोजच्या जगण्यातील अनेक वस्तूंच्या शोधांची ही रंजक कथा.