{"product_id":"bharatatil-shastrancha-udgam-va-vikas","title":"Bharatatil Shastrancha Udgam Va Vikas (भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास या पुस्तकात निरनिराळ्या शास्त्रांचा उद्गम व विकास भारतात व तुलनेने पाश्चात्य देशांत कसा होत गेला याचे विवेचन, सामान्य वाचकाला नजरेसमोर ठेवून, शक्य तेवढ्या साध्या भाषेत केलेले आहे. ज्ञानसाधनेत प्रामुख्याने भारतीयांनी अंतःप्रज्ञेचा व पाश्चात्त्यांनी तर्कप्रज्ञेचा उपयोग कसा केला व त्याचे परिणाम काय झाले हे मनोरंजक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. दोघांच्या ज्ञानसाधनेच्या मुळाशी असलेल्या मनोभूमिका उघड केल्या आहेत व त्यांच्या परिणामांची मीमांसा व त्यापासून घ्यावयाचे धडे यांचे दिग्दर्शन केले आहे. एवढे व्यापक क्षेत्र घेऊन इतकी आधुनिक शास्त्रीय प्रगतीची माहिती थोडक्यात सरस व सुबोध भाषेत देणारे मराठी भाषेत हे पहिलेच पुस्तक आहे असे म्हणावयास हरकत नाही. भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठतेचा अभिनिवेश अथवा तिच्या कनिष्ठतेचा न्यूनगंड न बाळगता त्यात ग्राह्य काय व त्याज्य काय हे मानवहितकारित्व व उपयोगिता या निकषांवर तपासून ठरवावे असे या पुस्तकात प्रतिपादन केले आहे. डॉ. व. दि. कुलकर्णी म्हणतात, \"पूर्व आणि पश्चिम यांच्यासंबंधीच्या तौलनिक विचाराला स्वामी विवेकानंदांनी चालना दिली... रवींद्रनाथ टागोरांनी कला आणि संस्कृती यांचा तौलनिक विचार करून पूर्व आणि पश्चिम यांमधील साधर्म्य - वैधर्म्य यांचा शोध घेतला. आज डॉ. पंढरीनाथ प्रभू हे विज्ञानाच्या संदर्भात पूर्व आणि पश्चिम पुन्हा तपासून पाहात असल्याचे प्रस्तुत ग्रंथांत दिसून येते.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. पंढरीनाथ प्रभू \u003cbr\u003eप्रकाशक. ग्रंथाली \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52972053528898,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BharatatilShastranchaUdgamVVikasF.jpg?v=1777204641","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bharatatil-shastrancha-udgam-va-vikas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}