{"product_id":"bharatiy-prajasattak-भारतीय-प्रजासत्ताक","title":"Bharatiy Prajasattak (भारतीय प्रजासत्ताक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभारतीय प्रजासत्ताक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसर्वच भारतीयांनी आपल्या गेल्या ७५ वर्षाच्या वाटचालीचा मागोवा घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी या ग्रंथाची उपयुक्तता फार मोठी आहे. या ग्रंथामध्ये देशाच्या वाटचालीतील निवडक घटना, संस्था आणि उपक्रमांचा उल्लेख आहे. त्याचे तपशील आणि आवश्यक ती आकडेवारीही आहे. मी ज्या संस्थेचे महासंचालक म्हणून ११ वर्षे नेतृत्व केलं, त्या सी. एस. आय. आर. च्या स्थापनेपासूनची वाटचाल यात खूप थोडक्यात पण समर्थपणे स्मिताने मांडली आहे. देशातील अशा प्रकारच्या विज्ञान-तंत्रज्ञानविषयक संस्था, कला, साहित्य, क्रीडा, नवनिर्माण, उद्योग, अर्थव्यवस्था, प्रसारमाध्यमे, भारतीय संविधानाची वाटचाल, अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांची निर्मिती, पर्यावरण, शेती, सहकार, संरक्षण व्यवस्था अशा अनेकविध क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना, टप्पे आणि त्या अनुषंगाने भारताची घोडदौड याचं यथार्थ चित्रण स्मिता देशपांडे यांनी या ग्रंथात केलं आहे. हा मागोवा घेत आता वाटचाल करायची आहे ती शताब्दीच्या दिशेने ! भारत केवळ एक सामर्थ्यशाली देश म्हणून पुढे येत असतानाच संपूर्ण विश्वासाठी त्याने आता योगदान द्यायला हवं. ही भूमिका घेऊन निर्धाराने पुढे येणाऱ्या सर्वांना हा ग्रंथ नक्की प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो. त्याबद्दल लेखिका स्मिता देशपांडे यांचे खूप कौतुक आणि विशेष अभिनंदन !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. स्मिता देशपांडे \u003cbr\u003eप्रकाशक. सह्याद्री प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51873452523842,"sku":"SAHY0002","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BharatiyPrajasattakF.jpg?v=1769233026","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bharatiy-prajasattak-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%95","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}