{"product_id":"bhartiy-swatantya-chalvalicha-arthik-pariprekshyatun-abhyas-1757-1947","title":"Bhartiy Swatantya Chalvalicha Arthik Pariprekshyatun Abhyas (1757-1947) (भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आर्थिक परिप्रेक्ष्यातून अभ्यास (१७५७-१९४७))","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBhartiy Swatantya Chalvalicha Arthik Pariprekshyatun Abhyas (1757-1947) (भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आर्थिक परिप्रेक्ष्यातून अभ्यास (१७५७-१९४७))\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक भारताचा इतिहास आपण अनेकदा राजकीय अंगाने पाहतो. मात्र भारतीय राष्ट्रीय चळवळ विकसित होत गेली, ती आर्थिक संदर्भातूनसुद्धा, कारण इथल्या ब्रिटिश राजवटीचा थेट संबंध इंग्लंडच्या आर्थिक धोरणांशी व भारताच्या आर्थिक शोषणाशी होता. भारत इंग्लंडची आर्थिक वसाहत होती. वसाहतवादी अर्थव्यवस्थेची वाणिज्यवादी अवस्था (इ. स. १७५७-१८१३), खुल्या व्यापाराची अवस्था (इ. स. १८१३-१८५७) आणि वित्तीय साम्राज्यवादी अवस्था (इ. स. १८५८-१९४७) या टप्प्यांमधून जे स्थित्यंतर होत गेले, तसतसे भारताचे आर्थिक शोषण वाढत गेले आणि भारतातील असंतोषही वाढत गेला. एकोणिसावे शतक भारताच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण टप्पा आहे. हे शतक म्हणजे भारतीय नवजागरणाचा, सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळींचा, आर्थिक विचारांचा, राष्ट्रवादाचा, स्वातंत्र्य आंदोलनाचा व आधुनिकतेचा आरंभकाल होता. या सर्वांना साकल्याने 'भारतीय प्रबोधन' म्हणता येईल. या प्रबोधनातूनच पुढे विसाव्या शतकात भारतात स्वातंत्र्य आंदोलन आकारास आले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा पाया जसा येथील सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळींनी घातला, तसा तो एकोणिसाव्या शतकात अनेक सामाजिक विचारवंतांनी मांडलेल्या आर्थिक विचारांनी अधिकच मजबूत केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक: डॉ.उत्तम पठारे , डॉ. लहू गायकवाड \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67684050141506,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/bhartiyswatantya-f.jpg?v=1791442259","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bhartiy-swatantya-chalvalicha-arthik-pariprekshyatun-abhyas-1757-1947","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}