{"product_id":"bhartiya-naastikvad","title":"Bhartiya Naastikvad (भारतीय नास्तिकवाद)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभारतीय नास्तिकवाद\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“जर हे जग ईश्वराने बनविले आहे, तर मग त्यामध्ये कोणताही बदल किंवा विनाश, \u003cbr\u003eतसेच दुःख आणि संकटे नसावीत. योग्य आणि अयोग्य किंवा पवित्र-अपवित्र या गोष्टी \u003cbr\u003eत्यांच्याकडूनच आल्या पाहिजेत.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“जर दुःख आणि आनंद, प्रेम आणि तिरस्कार या गोष्टी मनुष्यामध्ये भरण्याचे काम देव करतो, \u003cbr\u003eतर या गोष्टी त्याच्या स्वतःमध्येही असल्या पाहिजेत, आणि जर तसे असेल तर तो परिपूर्ण कसा?”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“जर देव हाच कर्ता आहे आणि सर्व काही त्यालाच समर्पित करायचे आहे तर मग सद्गुणांचा \u003cbr\u003eसराव करून उपयोग काय? सर्व काही त्यालाच द्यायचे आहे तर मग योग्य किंवा अयोग्य सारखेच \u003cbr\u003eहोतील आणि सर्व कर्मे सारखीच होतील.'\u003cbr\u003e\"\u003cbr\u003e“पण जर दुःख आणि वेदना या अन्य काही कारणांनी असतील, तर याचा अर्थ त्या ठिकाणी असे \u003cbr\u003eकाही आहे, की ज्याला देव कारणीभूत नाही. मग जे काही अस्तित्वात आहे, त्यामागे कोणतेही \u003cbr\u003eकारण नसावे, असे म्हणता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“पुन्हा एकदा, देव हाच निर्माता आहे, तर तो कोणत्याही कारणांनी किंवा विनाकारण कृती करतो. \u003cbr\u003eजर तो काही कारणांनी कृती करत असेल तर तो परिपूर्ण नाही असे म्हणावे लागेल. कारण इच्छा \u003cbr\u003eपूर्ण करण्यासाठी त्याने समाधानकारक कृती केली पाहिजे. जर तो विनाकारण कृती करत असेल \u003cbr\u003eतर तो वेडा किंवा दूध पिणारे बाळ आहे, असे म्हणावे लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“त्याशिवाय, जर देव निर्माता आहे, तर सर्व लोक त्याला आदराने पुजत का नाहीत, त्यांना जेव्हा गरज \u003cbr\u003eअसते तेव्हाच ते त्याच्यापुढे जाऊन विनवणी का करतात?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“आणि लोक एकापेक्षा अनेक देवांना का मानतात? अशा प्रकारे तर्काच्या युक्तिवादावर देवाची \u003cbr\u003eकल्पना ही चुकीची असल्याचे सिद्ध होते आणि अशा प्रकारचे सर्व विरोधाभास असलेली \u003cbr\u003eविधाने उघड झाली पाहिजेत. \"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : देविप्रसाद चट्टोपाध्याय\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : सचिन वाघमारे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56153038422338,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BHARTIYANASTIVADF.jpg?v=1789122809","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bhartiya-naastikvad","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}