Bhuiche Lalase ( भुईचे लळासे )
Bhuiche Lalase ( भुईचे लळासे )
Share
Author:
Publisher:
Pages: 171
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Bhuiche Lalase ( भुईचे लळासे )
Author : Indrajeet Bhalerao
इंद्रजित भालेराव यांच्या या संग्रहातील कविता प्रामुख्याने शेतकऱ्यांचे वर्तमान जीवन साकार करते. या देशात सुरू असणाऱ्या आधुनिकीकरणाच्या- औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेचे आक्रमण सनातन काळापासून अस्तित्वात असणाऱ्या कृषी संस्कृतीवर झाले आणि त्यातून या संस्कृतीच्या उद्ध्वस्तीकरणास प्रारंभ झाला. यातून प्रस्थापित कृषी जीवनात जटिल स्वरूपाचे अनेक आर्थिक, व्यावसायिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले. औद्योगिकीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राजकीय धोरणांमुळे या प्रश्नाकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. शेतकऱ्याभोवती अशी परिस्थिती निर्माण केली गेली, की जगण्याला मारक ठरू लागलेला शेती व्यवसाय सोडून अन्य व्यवसाय स्वीकारणेही त्याला अशक्य होऊन गेले. याबरोबरच सर्जनाचा आनंद देणाऱ्या या व्यवसायावरची त्याची निष्ठा आणि प्रेम त्याला कृषी जीवनाचा त्याग करायला प्रतिबंध करीत होती. हा व्यवसाय त्याला गुदमरून टाकणाऱ्या कर्जाच्या विळख्यात आवळू लागला. त्यामुळे त्याच्या पुढे आत्महत्येशिवाय अन्य पर्याय उरला नाही. शेतकऱ्यांच्या या दाहक आणि असह्य वास्तवाचे अतिशय प्रभावी चित्र इंद्रजित भालेराव यांनी या संग्रहात रेखाटले आहे.
वस्तुविनिमयातील अर्थकारण काळातील शेतकऱ्याच्या सुखी आणि निसर्गसंवादी जीवनापासून ते आजच्या चलननियंत्रित अर्थकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या त्याच्या जीवनापर्यंतचा मोठा पट ही कविता साकार करते. त्यामुळे तिला शेतकरी जीवनाच्या गाथेचे रूप प्राप्त झाले आहे.
It is Published By : Aditya Prakashan