{"product_id":"bol-bacchan","title":"Bol Bacchan (बोल बच्चन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबोल बच्चन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा जीवनसंघर्ष \u003cbr\u003eत्यांची लक्षात ठेवावीत अशी  गाणी आणि संवाद ,यातून प्रेरणा देणारी \u003cbr\u003eयशाची १८ सूत्रे \u003cbr\u003eआपणही या सूत्रांचा अवलंब करा \u003cbr\u003eआणि यशस्वी व्हा .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसुपरस्टार अमिताभ बच्चन! कोणाला वाटणार नाही, अमिताभबच्चनप्रमाणे यशस्वी व्हावं; त्यांच्याप्रमाणे अनेक वर्षं यशाच्या शिखरावर टिकून राहावं. आज अमिताभ बच्चन हिंदी सिनेसृष्टीतील शहेनशहा आहेत; पण याचा अर्थ असा नाही की, हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकताक्षणी ते सुपरस्टार बनले. उलट त्यांचं जीवन तर अनेक चढ-उतारांची एक मोठी गाथाच आहे. ज्यात उतारसुद्धा असे आले की, कित्येकदा त्यांचं सर्व काही संपण्याच्या वळणावर येऊन थांबलं होतं; पण कुठल्याही परिस्थितीत त्यांनी हार मानली नाही आणि अपयशाच्या अंधारातून बाहेर पडत पूर्वीपेक्षाही जास्त यशस्वी होत गेले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e त्यांचे अनेक चित्रपट संस्मरणीय आहेत. त्यापैकी काहींचे संवाद आणि गाणी तर इतकी लोकप्रिय झाली आहेत की, ती आपल्या रोजच्या बोलण्यातला एक महत्त्वाचा भाग होऊन राहिली आहेत. असेच लोकप्रिय 'बोल बच्चन' आणि अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक जीवन-संघर्षाने प्रेरित होऊन रुपेश दुबे यांनी आपले पहिले पुस्तक लिहिले आहे. प्रेरणादायी पुस्तकांच्या गर्दीत हे पुस्तक आपल्या मनोरंजक आणि वेगळ्या सादरीकरणामुळे सर्वांपेक्षा हटके आहे. तसेच यात दिलेली यशाची १८ सूत्रे वाचकांना नेहमीच प्रेरणा देत राहतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :  रुपेश दुबे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : मंजुषा मुळे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54947166650690,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BolBacchanF.png?v=1783065937","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/bol-bacchan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}