{"product_id":"brahmdeshatle-divas-ब्रह्मदेशातले-दिवस","title":"Brahmdeshatle Divas (ब्रह्मदेशातले दिवस)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eब्रह्मदेशातले दिवस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजॉर्ज ऑर्वेल हे वाचकांना त्यांच्या 'अॅनिमल फार्म' आणि 'नाइन्टीन एटीफोर' या भविष्यभयाचं सूचन करणाऱ्या दुस्वप्नकारक कादंबऱ्यांमुळे माहीत आहेत. ब्रिटिश राजवटीत ते पाच वर्षे ब्रह्मदेशात पोलिस अधिकारी होते. 'बर्मीज डेज' ही त्यांची पहिली कादंबरी. ह्या भाषांतरामुळे ती प्रथमच मराठीत येत आहे. ह्या कादंबरीद्वारे ऑर्वेल वसाहतवादाची चिकित्सा करतात. स्थानिकांचं होणारं शोषण, त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक, इंग्रज अधिकाऱ्यांच्या वंशवादी वर्तणूकीतून ते राजसत्तेची काळी बाजू दाखवतात. फ्लोरी हे पात्र परात्म अवस्था, संघर्ष, नैतिक तडजोडी यांसह एक विखंडित व्यक्तिमत्व आहे. त्याच्या चेहऱ्यावरच्या जन्मखुणेच्या निळ्या-काळ्या डागाची त्याला लाज वाटते. इंग्रजी समाजापासून परात्म असल्याचीही ती खूण आहे. ब्रिटिशांचा मग्रुरीचा, दांभिकपणाचा तो तिरस्कार करतो पण रंगामुळे मिळणारे फायदेही त्याला सोडवत नाहीत. स्थानिकांकडे तो अनादरानं पाहतो आणि त्यांच्याचकडून अधिमान्यताही मिळवू पाहतो. ऑर्वेल यांनी सर्वंकषवादाची, सामाजिक अन्यायाची सातत्यानं चिकित्सा केली आणि एकाधिकारशाही विचारांवर, भाषेवर नियंत्रण मिळवून स्वातंत्र्याला नष्ट करते हे सूत्र मांडलं. वर्गकलह, दारिद्र्य आणि साम्राज्यवादाचं त्यांनी एक प्रकारे विच्छेदनच केलं. त्यामुळेच ही कादंबरी तेव्हा इंग्लंडमध्ये प्रकाशित होऊ शकली नाही. आजही ऑर्वेल यांच्या लेखनाचं औचित्य जाणवतं. त्यांनी केलेले भविष्यभयाचे इशारे वास्तवात येताना पाहून आपण चकित होतो. रेश्मा तांबोळी यांनी भाषांतरासाठी याच कादंबरीची निवड करणं ही दाद देण्यासारखी गोष्ट आहे.        -------गणेश विसपुते\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. जॉर्ज ऑर्वेल\u003cbr\u003eअनुवादित लेखक. रेश्मा तांबोळी  \u003cbr\u003eप्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51848519254338,"sku":"9788199009820","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Brahmdeshatle_Divas_F.jpg?v=1768733873","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/brahmdeshatle-divas-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}