{"product_id":"buddha","title":"Buddha (बुद्ध)","description":"\u003cp\u003eस्वयंविकासासाठी प्रेरणादाय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eBuddha (बुद्ध)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभगवान बुद्धांच्या उपदेशांचे चिंतन केले असता त्यांच्या विचारांची मुळ भावना केवळ अध्यात्मिक राहात नाही; ती मन, बुद्धी आणि व्यवहाराच्या प्रत्येक स्तरास स्पर्श करते. त्यांची शिकवण वास्तववादी, वैज्ञानिक, अनुभवाधिष्ठित आणि मानवी मानसशास्त्रावर आधारित असल्याचे स्पष्ट दिसून येते. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि भावनिक चढ-उतारांनी भरलेल्या कॉर्पोरेट जगात हे तत्त्वज्ञान उपयुक्त ठरू शकते का? उत्तर- निश्चितच होय! कार्यस्थळी स्पर्धा, निर्णयांचे नैतिकदृष्ट्या गुंतागुंतीचे स्वरूप, अपेक्षांचा ताण, संबंधांचे तुटणारे भावनिक आयाम आणि यशाच्या धावपळीत हरवलेला अंतर्मनाचा शांत स्वर - या सर्वांसाठी बुद्धांचे तत्त्वज्ञान मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते. बुद्धांचे उपदेश स्व-जागरूकता, नेतृत्व, संवाद, स्थैर्य आणि सकारात्मक कर्मचक्र यांचे भान विकसित करतात. आधुनिक व्यवस्थापनशास्त्र आणि प्राचीन प्रज्ञाधारीत ज्ञानाची परिपूर्ण सांगड घालणारा विचारप्रवर्तक, उपयुक्त आणि प्रेरणादायी मराठी अनुवादीत ग्रंथ म्हणजे -\u003cstrong\u003e \"बुद्ध : दि एक्झिक्युटिव कोच\"\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. संतोषकुमार फुलपगार\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : डॉ. विनोद आर्य । डॉ. रत्नाकर आहिरे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67656587346242,"sku":null,"price":359.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BUDDHAF.jpg?v=1791204750","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/buddha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}